मुंबई | आज बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या. याप्रकरणी चौकशीसाठी तिला ३ ते ४ वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे कंगनाने दुर्लक्ष केले होते. अखेर आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली.
मात्र, वांद्रे पोलीस स्टेशनकडे रवाना होण्यापूर्वी कंगनाने तिच्या ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती म्हणतीये, ‘माझ्यावर अन्याय होतोय, हे संपूर्ण देश पाहत आहे. माझं घर पाडण्यात आलं, डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या प्रसंगात माझ्या बहिणीने मत व्यक्त केलं, त्यावेळेसही तिच्या आणि माझ्या विरोधात तक्रार झाली. त्यावेळी मी तर काही ट्विटही केले नव्हते.’
Why am I being mentally, emotionally and now physically tortured? I need answers from this nation…. I stood for you it’s time you stand for me …Jai Hind 🙏 pic.twitter.com/qqpojZWfCx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 8, 2021
तसेच पुढे ट्विट करत ती म्हणतीये, ‘माझा मानसिक, भावनिक आणि आता शाररिक छळ का केला जात आहे?, या देशाकडून मला याचे उत्तर हवंय… मी तुमच्यासाठी नेहमी उभी राहिली आणि आता तुम्ही माझ्यासाठी उभं राहण्याची वेळ आली आहे.’
दरम्यान, कंगनाने आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिने वांद्रे न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना व रंगोली या दोघींना अटकेपासून संरक्षण देतं वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्याचे आदेश दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
महिलांसाठी लष्करात मोठी संधी! अट फक्त १० वी पासची; ‘अशी’ करा नोंदणी
मुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड नेमकी कोणती चर्चा झाली? हात जोडत नितीन गडकरी म्हणाले…
शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यावर विरोधकांची टीका; ‘हे कसले आपडो सरकार, हे तर…’