बॉलिवूड माफिया, आदित्य पांचोली, हृतिक रोशन आता चांगले वाटताहेत; कंगनाचे धक्कादायक विधान

मुंबई | कंगणा सध्या सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरत आहे. आणि वारंवार कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे आणि वादग्रस्त वक्तव्ये करत आहे. त्यामुळे तिचे विरोधक जास्त वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच कंगणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

नेटकरी तिच्यावर प्रचंड संतापले होते. आता पुन्हा कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणे यांनी कंगणाचा उल्लेख नटी असा केला होता. त्यानंतर कंगणाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

कंगणाने लिहिले होते की, गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारकडून इतके कायदेशीर खटले, शिवीगाळ, अपमान आणि बदनामी सहन केली आहे की बॉलिवूड माफिया, आदित्य पांचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक आता चांगले वाटत आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यात असे काय आहे जे लोक मला एवढा त्रास देतात? असे वादग्रस्त वक्तव्य तिने केले आहे. उच्च न्यायालयाने कंगणाचा बाजूने निकाल दिल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी वक्तव्य केले होते की, एमएमसी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती.

अनधिकृत बांधकाम सुरू असताना ३५४ अ अंतर्गत २४ तास आधीच नोटीस दिली होती. सुडापोटी जर कारवाई केली असती तर मग त्या नटीने पीओकेशी तुलना करून जो मुंबईचा अपमान केला, त्यावर कुठल्या कोर्टात दाद मागायची? असा सवाल त्यांनी केला होता.

कंगणाला ही नोटीस बऱ्याच वेळा देण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर होईल असेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कंगणाने तिच्या बाजूने निकाल लागल्यानंतर एक व्हिडिओ जारी करून सगळ्यांचे आभार मानले होते.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लस प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन; जाणून घ्या..

संजय राऊतांनी ईडी आणि सीबीआयला दिली कुत्र्याची उपमा; पहा नेमकं काय म्हणाले..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.