बाॅलीवूडची क्वीन कंगणा भिडली थेट हाॅलीवूड स्टार्सला; चोरीवरून थेट फटकारले

रायन रेनॉल्ड्स हे हॉलिवूड मधील एक प्रसिद्ध नाव आहे. डेडपूल ह्या सुपरहिरो कॉमेडी चित्रपटामध्ये केलेल्या अभिनयाद्वारे अख्ख्या जगातील रसिक प्रेक्षक त्याचे फॅन होऊन गेले.

त्याने बऱ्याच सिरीयस भूमिका लीलया पेलल्या आहेत पण डेडपूल चित्रपटानंतर त्याची ताकद कॉमेडी भूमिकेमध्ये अधिक असल्याचे जाणवते आणि ह्याची जाण खुद्द रायनला सुद्धा आहेच.

त्यामुळेच की काय एकामागोमाग एक कॉमेडी चित्रपट घेऊन तो येत आहे. सध्या प्रदर्शनाच्या तयारीत असलेला फ्री गाय हा चित्रपट चर्चेत आहे. अलीकडेच द्वेण जॉन्सन उर्फ रॉक सोबतच्या त्याचा रेड नोटीस ह्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

चित्रपट आला की त्याचे प्रोमोशन्स हे आलेच. रायन रेनॉल्ड्स सध्या त्याच्या फ्री गाय ह्या चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे. काही तासांपूर्वी खास भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी रायन रेनॉल्ड्स ने आपल्या सोशल मीडियाद्वारे त्याच्या फ्री गाय ह्या चित्रपटाचे प्रोमोशन केले. त्यावेळी त्याने हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना खूप पसंत पडेल असे सांगितले. पुढे तो म्हणाला की , ‘आता हॉलिवूड ही बॉलिवूडची नक्कल करू लागले आहे , जिथे एक रोमिओ टाइप तरुण त्याच्या आवाक्या बाहेर असलेल्या सुंदर मुलीला रिझवण्यासाठी डान्स आणि ऍक्शन करतो. ‘

बॉलीवूड बद्दलचे रायनचे असे बोलणे कंगणाला अजिबात पटलेले दिसत नाही. ‘तुम्ही केवळ आमचा डान्स आणि ऍक्शनच नाहीतर आमच्या थेटर्सच्या स्क्रीन देखील चोरलेल्या आहेत.’ असे म्हणत तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत रायनच्या कानपिचक्या घेतल्या आहे.

कंगणाने भारतीय प्रेक्षकांच्याही कानपिचक्या घेतल्या आहेत. आपण सर्वांनी साऊथ आणि नॉर्थ ह्या वादात न पडता अमेरिकन , इंग्लिश चित्रपटांना बाहेरचा रास्ता दाखवला पाहिजे. हॉलिवूड इंडस्ट्री ने फ्रेंच , इटालियन आणि जर्मन चित्रपटश्रुष्टीला काबीज केलेले आहे. त्यामुळे अशी परिस्तिथी भारतीय चित्रपटश्रुष्टीवर न येण्यासाठी आत्मनिर्भर भारत पुढाकाराद्वारे एकत्र येण्याचे आव्हान तिने केले आहे.

महत्वाच्या बातम्या
१९७१ च्या भारत-पाक युद्धातील भारतीय विजयी रणगाड्यांचा धुराळा येणार रुपेरी पडद्यावर!
एक्सप्रेस हायवे नरिमन पाॅइंटपर्यंत न्हेनार; नितीन गडकरी सुसाट
निलेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका, म्हणाले, ‘तु जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं’
राखीचा काही नेम नाही! आमदाराला म्हणाली, माझे नाव घेतले तर मी तुमचा चड्ढा उतरवेन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.