बड्या बड्या बाता मारणारी कंगना घाबरली;आता काय केलं पहा…

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रनौत वादात आहे. सोबत तिची बहिण रंगोलीदेखील वादात सापडत असते. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना एका प्रकरणात चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.

परंतु कंगणा आणि रंगोली अजुनही मुंबई पोलिस ठाण्यात आलेल्या नाही, त्यामुळे कंगणा आणि बहिण रंगोली मुंबई पोलिसांना घाबरली की काय? आशी चर्चा सुरू आहे.

२१ ऑक्टोबर रोजी कंगना रणौत आणि तिची बहीण रांगोली यांना मुंबई पोलीसांनी प्रथम नोटीस पाठविली होती. आणि निवेदन नोंदवण्यासाठी वांद्रे पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले. पण यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीच्या वकिलाने सांगितले की, सध्या कंगना हिमाचल प्रदेशात आपल्या भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे, यामुळे ती अद्याप हजर होऊ शकत नाही.

यानंतर, ३ नोव्हेंबरला पुन्हा कंगणाला नोटीस पाठवण्यात आली. मुंबई पोलिसांनी १० नोव्हेंबरला दोन्ही बहिणींना पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितले, पण कंगनानेही हा प्रस्ताव स्वीकारला नाही. कंगणाने सांगितले की आपल्या भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याने १५ नोव्हेंबरनंतर ती चौकशीसाठी उपलब्ध होईल.

गेल्या महिन्यात वांद्रे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने बॉलिवूडचे कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर मुनव्वर अली सय्यद यांनी केलेल्या तक्रारीवर तपास करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.