…तर ठाकरे सरकार कोसळेल; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक

मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण ५-७ जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे यांच्या शिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्विट करत कंगना म्हणतीये, ‘माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच याच पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.’

तसेच पुढे कंगनाने म्हंटले आहे की, ‘जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं. माझ्याविरोधात आणखी 200 गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे.’

 

महत्त्वाच्या बातम्या 

पीएम कुसुम योजनेतून मिळणार सौर कृषिपंपाचा लाभ, जाणून घ्या कुठे करायचा अर्ज

सावधान! मासे तुमच्या पोटात घालतात प्लास्टिक, अहवालातून झाला ‘हा’ धक्कादायक खुलासा

“देवेंद्र फडणवीसांना पोलिस गुप्त माहिती पुरवतात”- संजय राऊत

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.