आंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना तुरुंगात टाकून त्यांची सगळी संपत्ती जप्त करा; बेताल कंगणा

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने आंदोलक शेतकऱ्यांवर सडकून टीका केली.

कंगना म्हणतीये, ‘जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली जावी, अशी मागणी करताना हा देश, याचं सर्वोच्च न्यायालय, इथलं सरकार हे सर्व थट्टा बनून राहिलं आहे,’ अशा शब्दांत कंगनाने आजच्या हिंसाचारावर भाष्य केले.

तसेच ती पुढे म्हणतीये, ‘स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. हे खुलेआम होत असून सर्वांच्या समोर हा तमाशा सुरु आहे. जगात आज आपली खिल्ली उडवली जात असेल आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही, आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो.’

याचबरोबर ‘दुसऱ्या देशाचे पंतप्रधान भारतात आले तरी आपण नग्न होऊन बसतो. यामुळे या देशाचे काहीही होणार नाही. जर सर्वकाही असंच सुरु राहिले तर कोणी देशाला दहा पाहलं पुढे नेऊ पाहत असेल तर तो वीस पावलं मागं आणण्याचं काम केलं जात आहे आणि आपण सर्वजण केवळ तमाशा पाहत आहोत,’ असे कंगनाने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मुकेश अंबानी, संजय राऊतांसह ९७ जणांना पद्म पुरस्कार देण्याची राज्याची शिफारस मोदी सरकारने नाकारली
‘हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा’
खास कॅप्शनसह वरुणने शेअर केले लग्नाचे फोटो; ‘या’ शब्दात केलेय बायकोचे कौतूक..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.