‘कंगणा राणावत हाजीर हो! सुशांत प्रकरणी आता कंगणाचीच होणार चौकशी; पोलीसांकडून समन्स’

 

मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री कंगणा राणावतला वांद्रे पोलिसांनी, पोस्टाने समन्स पाठवले आहे. कंगणाचा जबाब नोंदवण्यासाठी हे समन्स कंगणाला पाठवण्यात आले आहे.

कंगणाला पाठवण्यात आलेले हे दुसरे समन्स आहे. तसेच याआधीही कंगणाला समन्स पाठवण्यात आले होते. मात्र ती सध्या मनालीमध्ये असल्याने तिला चौकशीसाठी येणे शक्य झाले नाही.

सुशांतच्या आत्महत्यानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या वादास सुरवात झाली आहे. याबाबत कंगणा राणावतने आपले मत मांडत सुशांत घराणेशाहीच्या दबावाला बळी पडला असून त्याने आत्महत्या केली आहे, असे कंगणाने म्हटले होते.

तसेच सुशांत सिंगने आत्महत्या केली नसून बॉलिवूडच्या घराणेशाहीकडून झालेली ही हत्या आहे, असे देखील कंगणा राणावत म्हणाली होती. आता वांद्रे पोलिसांनी कंगणालाच चौकशीसाठी बोलवण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत २८ हुन अधिकजणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहे. मात्र आता कंगणालाच जबाबासाठी बोलवण्यात येणार आहे, यामुळे कंगना यावेळेस कोणता गौप्यस्फोट करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.