मी माझ्या बापाला सुनावले होते, की मी तुमच्या कानाखाली वाजवेल; कंगनाने सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिने नुकतेच एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कंगनाने तिचे आणि वडिलांचे नाते कसे होते याबद्दल भाष्य केले आहे.

कंगना नेहमीच प्रत्येक विषयावर आपले मत मांडत असते. यामुळे बर्‍याच वेळा ती वादाच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे. अशात तिने आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यामध्ये वडिलाबाबत कंगनाने सांगितले आहे. हे सांगत असताना तिने फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांवर टीका केली आहे.

कंगनाने तीन ट्विट केले आहेत. या ट्विटनंतर तिला ट्रोल केले जात आहे. पहिल्या ट्विटमध्ये ती म्हणते, माझ्या वडिलांकडे राय़फल आणि बंदूक होती, मी लहान असताना त्यांनी मला रागावले की माझे पाय थरथर कापायचे माझ्या वडिलांची ओळख गुंड म्हणून होती. मी वयाच्या १५ व्या वर्षीच वडिलांसोबत भांडण करुन घर सोडले होते. अशा पद्धतीने मी वयाच्या १५ वर्षातच पहिली बंडखोर राजपूत महिला ठरले होते.

यानंतर तिने लगेचच दुसरे ट्विट केले आहे. यामध्ये ती म्हणते, या चिल्लर इंडस्ट्रीच्या लोकांना असे वाटते की, मला मिळालेले यश माझ्या डोक्यात गेले आहे आणि ते मला नीट करू शकतात. मी नेहमीच बंडखोर होते. यशामुळे माझा आवाज वाढला आहे. आणि मी देशातील सर्वात महत्त्वाच्या आवाजापैकी एक आहे. इतिहास साक्षी आहे, की ज्यांनी-ज्यांनी मला नीट करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांना मीच नीट केले आहे.

कंगनाने ट्विटमध्ये तिचा वडिलांसोबतचा एक प्रसंग सांगितला आहे. ती म्हणते मी जगातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. मी शाळेत जाण्यास नकार दिला तेव्हा वडिलांनी मला चापट मारण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांचा हात धरला आणि म्हणाले, जर तुम्ही मला मारहाण केली तर मीसुद्धा तुम्हाला चापट मारेल.

तेव्हा माझ्या वडिलांनी मला फक्त पाहिले आणि निघून गेले. त्यानंतर मी कधीच त्यांच्याजवळ जाऊ शकले नाही. मी त्यांच्या पासून कायमची दूर गेले. यातून मला एवढेच सांगायचे आहे की, मी पिंजऱ्यात राहू शकत नाही आणि स्वतंत्र्य मिळवण्यासाठी मी काहीही करु शकते.

महत्त्वाच्या बातम्या-
कंगना राणावत म्हणते, ‘कठीण काळात मला वडिलांनीही मदत केली नाही’
कंगनाने स्वत:च स्वत:ला दिलाय सर्वोत्तम अभिनेत्रीचा किताब; ट्रोलर्सने घेतली कंगनाची मजा
पेट्रोलच्या वाढत्या दरापासून आता होईल सुटका, भारतात लॉन्च झाली इलेक्ट्रिक सायकल
शेवटी पोटाचा प्रश्न! शिपाई पदाच्या १३ जागांसाठी २७ हजार अर्ज, वाचा बेरोजगारीची भीषणता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.