“अर्णब गोस्वामीवर जितका अत्याचार होईल तितके ते अधिक बलवान होतील”

अभिनेत्री कंगना रणौत सातत्याने अर्णब गोस्वामीच्या अटकेबाबत बोलत असते. आताही कंगणाने अर्णब गोस्वामीच्या समर्थन करण्यासाठी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात अर्णब गोस्वामीसोबत झालेल्या कथित अत्याचाराबद्दल कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे.

व्हिडीओ शेअर करताना कंगनाने ट्विटरवर लिहिले आहे की, “बॉलिवूडमध्ये ड्रग माफिया, बाल तस्करीचा धंदा उघडकीस आणण्यासाठी आणि सोनियांना त्यांच्या मूळ नावाने संबोधल्याबद्दल अर्णब गोस्वामीवर अत्याचार केले जात आहेत.

कंगणा व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाली की, एक माणूस होता ज्याने २०१८ ला आत्महत्या केली. आणि काही लोकांची नावे लिहून आत्महत्या केली. लिहिताना त्याने लिहिले की अर्णब जी माझे पैसे वेळेवर देत नाहीत, म्हणुन मी आत्महत्या करीत आहे.

पण अर्णबच्या टीमचे म्हणणे आहे की त्याने त्यांना ते पैसे दिले. वेळेवर पैसे न दिल्यास कुणीही आत्महत्या करू शकेल की नाही याचा निर्णय कोर्ट घेवू शकतो. जर तो असे करतो तर तो इतका मोठा गुन्हा आहे की ज्यासाठी खटला चालू आहे?

कंगना रणौत पुढे म्हणाली ‘त्यांना कशाची शिक्षा दिली जात आहे हे सर्वांना माहित आहे, त्यांना तुरूंगात घेऊन जाण्यात आले. अर्णबजी स्वत: म्हणात आहेत की त्यांच्यावर अत्याचार होत आहेत.

पप्पू सेना त्यांच्यावर अत्याचार करीत आहे कारण सोनियाचे खरे नाव अर्णबजीने संबोधिले आहे, याला फॅसिस्ट सरकार असे म्हणतात. मला पप्पू सेनेला सांगायचे आहे की ह्या मूर्खपणामुळे त्यांनी अर्णब गोस्वामीजी यांना आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय पत्रकार केले आहे.

कंगना पुढे म्हणाली की, अर्णब गोस्वामीवर जितका अत्याचार होईल तितके ते अधिक बलवान होतील. त्यांची लोकप्रियता वाढतच जाईल आणि घटनेच्या चौथ्या स्तंभावर जे काही केले त्या पप्पू सेनेला याच नावाचा इतिहास आठवेल. इतिहासातील हिरो म्हणून अर्णब गोस्वामीजींना आठवले जाईल.

अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ कंगना कडाडली, म्हणली….

‘मी गोस्वामी यांना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात निघालोय हिंमत असेल तर अडवून दाखवा’ 

‘मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’… फुकटच्या टीमक्या’ 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.