केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. बिहारमध्ये मोदी सरकाराच्या ‘अग्निपथ योजनेचा(Agneepath Scheme) विरोध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमधील तरुण विद्यार्थी ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आंदोलन करत आहेत.(Kangana Support Agneepath plan, citing Israel as an example)
अग्निपथ योजनेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनावर अभिनेत्री कंगना राणावतने आपले मतं व्यक्त केले आहे. अभिनेत्री कंगना राणावतने अग्निपथ योजनेचे समर्थन केले आहे. अभिनेत्री कंगना राणावतने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘अग्निपथ’ योजनेला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री कंगना राणावतने यासंदर्भात इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.
अभिनेत्री कंगना राणावतने अग्निपथ’ योजनेचे सम्राटन करताना पोस्टमध्ये लिहिले आहे की, “इस्रायलसारख्या सर्व देशांनी आपल्या तरुणांसाठी सैन्य प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. यामुळे या देशामधील प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील काही वर्षे सैन्याला देऊन शिस्त आणि देशभक्तीसारखे जीवनाचे मंत्र शिकतात आणि त्याच वेळी सीमेवर राहून आपल्या देशाचे रक्षण करणे म्हणजे नेमकं काय असतं? हे त्यांना कळते.”
“अग्निपथ हे करिअर बनवणे, रोजगार मिळवणे किंवा पैसे कमवणे यापेक्षा अधिक आहे. जुन्या काळी प्रत्येकजण गुरुकुलमध्ये जात असे आणि ही गोष्ट अगदी तशीच आहे. फक्त यावेळी तुम्हाला ते करण्यासाठी मोबदला मिळत आहे”,असे अभिनेत्री कंगना राणावतने पोस्टमध्ये लिहिले आहे. यावेळी अभिनेत्री कंगना राणावतने केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचे उघडपणे समर्थन केले आहे.
अभिनेत्री कंगना राणावतने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “अनेक तरुण ड्रग्ज आणि PUBG मध्ये उद्ध्वस्त होत आहेत. या तरुणांना योग्य मार्ग देण्यासाठी ‘अग्निपथ’ योजना महत्वाची आहे. असे निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे कौतुक करायला हवे”, असे अभिनेत्री कंगना राणावतने पोस्टमध्ये लिहिले आहे. ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत.
बिहारमध्ये अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले आहे. तेलंगणामधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आंदोलनकर्त्यांनी तोडफोड करत एका ट्रेनला आग लावली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
तो अभिनेता आणि ती भिती…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा रामदेव बाबांसमोर हैराण करणारा खुलासा
कौतुकास्पद! मेंढ्या चारून १० वीत पाडले तब्बल ९२ टक्के, पडळकरांनीही केले कौतुक, म्हणाले…
भाजपकडून आमदारांना फोन करून दबाव टाकला जातोय, नाना पटोलेंचा गंभीर आरोप