कंगणाचे शिवसेनेबाबतच ‘ते’ वक्तव्य निघालं खोटं; सर्वांसमोर आपटली तोंडावर

मुंबई| कंगणा सतत आपल्या वादग्रस्थ विधानामुळे चर्चेला उधान देत असते. गेले काही दिवस झाले कंगना आणि शिवसेनेचा मुंबईवरून वाद सुरू आहे. मुंबईवरून सुरु असलेल्या या वादामध्ये अजून भर पडली आहे.

कंगणाने नुकतेच एक नवीन विधान केले आहे. आणि यावरून ती पुन्हा ट्रोल होत आहे. कारण यावेळी तिचे हे विधान साफ खोटे निघाले आहे. यामुळे तिने परत एकदा चर्चेला उधाण दिले आहे.

मला नाइलाजाने शिवसेनेला मतदान करावे लागले आहे असे तिने एका मुलाखती दरम्यान म्हणले आहे.मी भाजपची समर्थक आहे. मात्र युतीमुळे मला शिवसेनेला मतदान करावे लागले असे तिने सांगितले. मी शिवसेनेला मतदान केले तरी शिवसेनेने मला अशी वागणूक दिली असही ती यावेळी बोलताना म्हणाली.

मात्र, कंगणाचे हे वक्तव्य चुकीचे ठरले आहे. कारण कंगणाने ज्या मतदार संघातून मतदान केले आहे त्या मतदार संघामध्ये शिवसेनेचा उमेद्वार नसल्याची माहिती समोर आली आहे.२०१४ मध्येच शिवसेना युतीमधून बाहेर पडली आहे. मग कंगणाने शिवसेनेला मतदान केले कसे. असा सवाल उभा राहिला आहे.

२००९ ते २०१९ मध्ये तीन लोकसभा आणि तीन विधासभा निवडणूका झाल्या आहेत. २०१४ मध्ये शिवसेना युतीमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे सर्व जागा ह्या भाजपाकडे आहेत. मग कंगणाने शिवसेनेला मतदान केले कसे.

२०१४ मध्ये भाजप विरोधी शिवसेना असल्यामुळे कंगणाकडे भाजप हा पर्याय होता. मग तरी पण तिला शिवसेनेला मतदान करण्याची वेळ कशी काय येऊ शकते असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.