कंगणाने शेअर केला नैवेद्याच्या ताटाचा फोटो, ताटातील कांदा पाहून लोकांनी झापले

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चे असलेली अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी देशात घडत असलेल्या गोष्टींवर मत मांडत असते. कंगणा बॉलिवूडमधील अभिनेत्री, अभिनेते, राजकीय नेते यांच्यावर नेहमी टीका करत असते. त्यामूळे बॉलिवूडमध्ये तिचे मित्र कमी आणि दुश्मनचं जास्त आहे.

कंगणा नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेत असते. सोशल मिडियावर कंगणा चर्चेचा विषय बनत असते. कंगणाने सोशल मिडियावर तिच्या घरातील नैवेद्याच्या ताटाचा फोटो शेअर केला आणि यावरून नेटकऱ्यांनी कंगणाला चांगलेच ट्रोल केले आहे.

कंगणाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर दुर्गाष्टमीच्या दिवशीचा घरातील पुजेचा फोटो शेअर केला. त्यामध्ये नैवेद्याच्या ताटात कांदा आणि मिर्ची पाहून नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला आहे. कंगणाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका नेटकऱ्याने म्हटलं की देवीच्या पुजेच्या प्रसादात कांदा?, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं मंदीरातून चप्पल घेऊन जाते. प्रसादात कांदा खाते. अन्नदात्याला आतंकवादी म्हणते. ही कसली हिंदु. असं म्हटलं आहे. प्रसादासोबत कांदा कोण खातं. हे कोणत्या धर्माने शिकवलं आहे. असं एकाने म्हटलं आहे.

दरम्यान कंगणानेही नेटकऱ्यांना चोख प्रत्यूत्तर दिले आहे. कंगणाच्या या फोटोवरून  येत्या काळात नव्या वादाला तोंड फुटतंय काय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कंगणा तिच्या आक्रमक शैलीमुळे प्रसिध्द आहे. तिच्या विरोधात कुणी बोललं की त्यानंतर ती त्याचा चांगलाच समाचार  घेत असते.

कंगणाने काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या बाजूने उभी राहिली होती. दिग्दर्शक करण जोहरवर कंगणा चांगलीच भडकली होती. अभिनेता कार्तिक आर्यनला पाठिंबा देत करण जोहर आणि त्याच्या नेपोटिझम गॅंगला घाबरण्याची गरज नाही. असं म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
सलमान खानचे नाव घेत राखी सावंत रोडवर ढसाढसा रडली, वाचा सविस्तर
चित्रपटसृष्टी हळहळली! ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्करांचे कोरोनाने निधन
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात प्रेग्नंट हिरोईनने केला “वाथी कमिंग” गाण्यावर भन्नाट डान्स
सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या रिमी सेनने का सोडली फिल्म इंडस्ट्री?

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.