कंगणा म्हणते, पंंतप्रधान मोदी देशासाठी पित्यासमान आहेत; पंतप्रधान म्हणजेच देश आहे

मुंबई | देशात कोरोनाने वर्षभरापासून थैमान घातले आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थीवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

देशात वाढत्या रुग्णसंखेमुळे बेड, ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री पंगा क्वीन कंगणा राणावत मोदींच्या पाठीशी उभी राहिली आहे.

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी देशात घडत असलेल्या गोष्टींवर मत मांडत असते. कंगणा नेहमी वेगळेचं वक्तव्य करून वाद ओढावून घेत असते. सोशल मिडियावर कंगणा चर्चेचा विषय बनत असते.

कंगणाने आता एक नवं ट्विट केलं आहे. कंगणा राणावत म्हणते की, पंतप्रधान म्हणजेच देश आहे. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असा विचार चुकीचा आहे. असं असेल तर मग लोकशाहीचं ढोंग का करावं.

कंगणा पुढे म्हणाली, मतदान करत एक प्रतिनिधी निवडण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च का करावा.  पंतप्रधान देशासाठी पित्यासमान आहेत. त्यांच्यावर शंका, त्यांच्या पराभवाची इच्छा करणं म्हणजे मुर्खपणाच आहे. असं ट्विट कंगणा राणावतने केलं आहे.

कंगणा नेहमी देशातील लोकांवर टीका करत असते. कंगणाने शेतकऱ्यांवरही टीका केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सुध्दा कंगणाने निशाणा साधला होता. इतकचं काय अभिनेते, अभिनेत्री यांच्यावरही कंगणा टीका करत असते. आता कंगणाच्या ट्वीटला नेटकरी काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुमचं तुम्ही बघून घ्या, अमेरीकेचा भारताला ठेंगा; लसीसाठी कच्च्यामालाची मागणी फेटाळली
लोकांना खायला अन्न नाही, अन् तुम्ही पैसे उडवता! लाजा वाटूद्या; अभिनेत्यांवर नवाजूद्दीन संतापला
अनिल देशमुख आता पुरते अडकले! मुंबई नागपुरातील घरांवर सीबीआयने टाकले छापे

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.