पंगा क्वीन कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड; वादग्रस्त विधान केल्याने ट्विटरची कारवाई

मुंबई | बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी देशात घडत असलेल्या गोष्टींवर मत मांडत असते. कंगणा नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेत असते. ट्विटरवर बेजबाबदारपणे ट्विट करण्याचा कंगणाने सपाटाच लावला होता.

पश्चिम बंगालच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिथे हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर कंगणाने बंगालमधील जनतेबद्दल आणि तृणमुल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह विधानं केली होती.

कंगणाच्या या ट्विटला अनेकांनी रिपोर्ट केलं होतं. त्यानंतर ट्विटरकडून कंगणा राणावतचे ट्विटर हॅंडलवर सस्पेंडची कारवाई करण्यात आली आहे. कंगणाने केलेल्या आक्षेपार्ह ट्विटनंतर लोक चांगलेच संतापले होते. कंगणाला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले होते.

ट्विटर अकाऊंटवर कारवाई केल्याने कंगणा फेसबूकवर व्हिडिओ शेअर करत ढसाढसा रडली आहे. व्हिडिओमध्ये कंगणा म्हणते की, बंगालमध्ये हिंसाचार होत आहे. खून, बलात्कार होत आहेत. लोकांची घरे जाळली जात आहेत. मात्र कोणताच आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र याची दखल घेत नाहीये.

मला कळत नाही की ही लोकं काय करणार आहेत. या देशद्रोह्यांना का घाबरत आहात. हिंदु लोकांचं रक्त एवढं स्वस्त झालं आहे का?  हे देशद्रोही देश चालवणार आहेत का? या क्षणी राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. मी सरकारला विनंती करते की कडक पावलं उचलून कारवाई केली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-
‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटासाठी पहीली पसंत होती कंगना राणावत; पण तिच्या एका चुकीमूळे…
विराट कोहलीच्या अगोदर ‘या’ क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अनूष्का शर्मा
बंगालमध्ये भाजप हारली, मात्र या महिला आमदाराची देशात होतेय चर्चा
भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या मोठ्या व्यक्तिने राजकारणाला ठोकला रामराम

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.