‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटासाठी पहीली पसंत होती कंगना राणावत; पण तिच्या एका चुकीमूळे…

बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत तिच्या बेबाक स्वभावामूळे नेहमीच चर्चेचा विषय बनते. ती कोणत्या ना कोणत्या कारणामूळे विवादात अडकत असते. म्हणूनच तिला ड्रामा क्वीन देखील बोलले जाते. राजकारण असो किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे कंगना तिचे मुद्दे माडत असते.

कधी कधी कंगनाचे बोलणे तिच्यासाठीच अडचणी निर्माण करत असतात. पण त्याचा तिला काहीही फरक पडत नाही. ती बिंधास्तपणे तिचे मत मांडत असते. असे बोलले जाते की, कंगना इंडस्ट्रीतील खुप कमी कलाकारांचे कौतूक करत असते. इंडस्ट्रीमध्ये तिचे मित्र कमी आणि दुश्मनच जास्त आहेत.

असे बोलले जात असले तरी कंगना अनेक वेळा दुसऱ्या कलाकारांचे कौतूक करताना दिसली आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने अभिनेत्री विद्या बालनचे कौतूक केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटातील अभिनयासाठी कंगनाने विद्या बालनचे कौतूक केले आहे.

त्यासोबतच कंगना खुलासा केला की, हा चित्रपट पहीलं कंगनाला ऑफर करण्यात आला होता. पण त्यावेळी काही कारणामूळे तिने या चित्रपटाला नकार दिला आणि हा चित्रपट विद्याकडे गेला. कंगनाच्या मते विद्याने या चित्रपटात खुप चांगले काम केले आहे.

कंगनाने सांगितले की, द डर्टी पिक्चरसाठी विद्या कधीच दिग्दर्शकांची पहीली पसंत नव्हती. त्यांनी हा चित्रपट कंगनाला लक्षात ठेवून लिहीला होता. दिग्दर्शकांनी कंगनाला चित्रपटाची ऑफर दिली त्यावेळी तिला काहीही कळत नव्हते. कोणत्या तरी छोट्या कारणामूळे कंगनाने द डर्टी पिक्चर चित्रपटाला नकार दिला होता.

पुढे जाऊन द डर्टी पिक्चर चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यावेळी कंगनाला वाईट वाटले होते. पण चित्रपटात विद्या बालनचे काम पाहील्यानंतर मात्र तिला अजिबात वाईट वाटले नाही. विद्याचे काम पाहील्यानंतर कंगना खुप आनंदी झाली होती. तिला चित्रपट नाकारल्याचे दुख झाले नव्हते.

कंगना म्हणाली की, ‘द डर्टी पिक्चर चित्रपटात विद्या बालनने केलेले काम खुपच उत्तम आहे. मी तिच्यापेक्षा चांगले काम करु शकले नसते. म्हणून बरं झालं की मी चित्रपटाला नकार दिला. नाही तर चित्रपट भवतेक एवढी कमाई करु शकला नसता’.

महत्वाच्या बातम्या –
गोलमाल फेम विकास कदमची बातच न्यारी; करतोय कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा भारी
‘तारक मेहता..’ मालिकेत दयाबेन कधी येणार? निर्माते असीम मोदींनी स्पष्टच सांगीतलं..
बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकांनी केले आहेत दोन लग्न; जाणून घ्या कोण कोण आहे या यादीत?
विराट कोहलीच्या अगोदर ‘या’ क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अनूष्का शर्मा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.