आज करोडोंची मालकीन असणाऱ्या कंगनाकडे एकेकाळी कपडे घ्यायलाही पैसे नव्हते

३४ वर्षांची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामूळे चर्चेत असते. ती तिच्या बिंधास्त वागण्यामुळे नेहमी काही न काही वाद निर्माण करते आणि त्यामूळे ती नेहमी चर्चेत असते.

आज अनेकांच्या नाकात दम करणारी कंगना एकेकाळी खुप भित्री होती. तिच्या या भित्र्या स्वभावामूळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामूळे कंगनाने घाबरणे सोडून दिले आणि प्रत्येक गोष्टीचा सामना करायला शिकली.

सर्वांच्या नाकात दम करणारी कंगना आज करोडोची मालकीन आहे. पण तिच्या करिअरच्या सुरुवातीला कंगनाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. कारण कंगनाने बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडले होते.

ज्यावेळी कंगनाने घर सोडले त्यावेळी तिच्या खुप कमी पैसे होते. तेवढेच पैसे घेऊन ती मुंबईत अभिनेत्री होण्यासाठी आली होती. त्यामूळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

कंगनाने बॉलीवूडमध्ये डेब्यु केल्यानंतर तिला अनेक कार्यक्रमांमध्ये जावे लागायचे. पण तिथे जाताना कंगनाला कोणते कपडे घालावेत हा प्रश्न पडायचा. कारण मोठ्या ब्रँडचे कपडे घेण्यासाठी पैसे नसायचे. त्यामूळे ती एखादा कमी किमतीतला ड्रेस घालून कार्यक्रमांमध्ये जायची.

एवढेच नाही तर तिच्याकडे त्या ड्रेसवर घालण्यासाठी कोणतेही दागिने नसायचे. अशा वेळी ती कमी किंमतीत खरेदी केलेले दागिने घालायची. असे करत करत तिने तिचे सुरुवातीचे दिवस काढले.

कंगनाने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ‘माझ्याकडे मोठ्या ब्रँडचे कपडे आणि दागिने नव्हते. म्हणून मी एक पिवळ्या रंगाचा ड्रेस खरेदी केला होता आणि त्यावर दागिने नव्हते म्हणून एक पिवळी लेस गळ्यात घातली होती.’

कंगनाच्या या लुकची त्या वेळी खुप जास्त चर्चा झाली होती. कंगनाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. त्या वेळी तिने या कार्यक्रमामध्ये घातलेला ड्रेस तिला तिच्या एका मैत्रिणीने गिफ्ट केला होता.

कंगनाकडे तिच्या करिअरच्या सुरुवातीला ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. पण आज ती अनेक ब्रँड्सची ब्रँड ambassador आहे. आज तिच्या एका ड्रेसची किंमत लाखो रुपये आहे. तिने तिचे हे यश तिच्या मेहनतीने मिळवले आहे.

महत्वाच्या बातम्या –

नेपोटिझम किंग करण जोहर परत एकदा स्टार किडला करणार लॉन्च; जाणून घ्या कोण आहे ती स्टार किड

वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर व्हिडीओ शेअर करत कंगनाने चाहत्यांना दिली गुड न्यूज; पहा व्हिडीओ

करण जोहरने त्याच्या करोडोंच्या संपत्तीमध्ये शाहरुख खानच्या मुलांना दिला आहे वाटा; कारण…

बॉलिवूडचं क्यूट कपल रणबीर कतरिनाची ब्रेकअप स्टोरी; वेगळं होण्याचं कारण वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.