कंगनावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केला होता काळी जादू केल्याचा आरोप

फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या रोज एका नवीन विषयावरून वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे सगळीकडे बॉलीवूडबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. एवढेच नाही तर रोज फिल्म इंडस्ट्रीतील एका नव्या कलाकाराचे नाव वादाच्या भवऱ्यात अडकत आहे.

तर अनेक वेळा कलाकारांवर गंभीर आरोप केले जातात. त्यामुळे देखील बॉलीवूड कलाकार सध्या खुप जास्त बदनाम होत आहेत. पण असे पहिल्यांदा झाले नाही. या अगोदरही अनेक वेळा बॉलीवूड अभिनेत्यांवर गंभीर आरोप झाले आहेत.

या आरोपांमूळे काही अभिनेत्यांनी जेलची हवा खाल्ली आहे. तर काही जणांचे करिअर खराब झाले आहे. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्यांबद्दल ज्यांच्यावत गंभीर आरोप करण्यात आले होते.

१) नाना पाटेकर – नाना पाटेकर बॉलीवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आजपर्यंत त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पण नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या चित्रिकरणाच्या वेळी हा प्रकार घडला होता. असे तनुश्री दत्ता म्हणाली होती. यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती.

२)अलोक नाथ – अलोक नाथ यांना बॉलीवूडमध्ये संस्कारी वडील म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने वडिलांची भुमिका निभावली आहे. पण अलोक नाथवर देखील गंभीर आरोप झाले होते.

लेखिका, फिल्ममेकर विनिता नंदा यांनी अलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी या प्रकरणामूळे अलोक नाथच्या करिअरवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. पण कालांतराने हे प्रकरण शांत झाले.

३)आदित्य पंचोली – फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात अधिक वादामध्ये अडकणाऱ्या कलाकारांमध्ये आदित्य पंचोलीचे नाव सर्वात पहिले येते. आदित्य पंचोली रोज कोणत्या ना कोणत्या कारणांमूळे वादाच्या भवऱ्यात अडकत असतो.

पुजा बेदीच्या घरातील मोलकरीणीने आदित्यवर बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हा या गोष्टीची सर्वात जास्त चर्चा झाली होती. हे पहिल्यांदा झाले नव्हते. या अगोदरही आदित्यवर असे अनेक गंभीर आरोप झाले होते.

४)कंगना राणावत – अभिनेत्री कंगना राणावत सध्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून नेहमीच चर्चेत असते. ती कधी राजकारणातील मुद्द्यावरून वादात येते. तर कधी बॉलीवूड कलाकारांसोबत झालेल्या भाडणांमूळे ती चर्चेचा विषय बनते.

पण काही वर्षांपूर्वी कंगना तिच्या रिलेशनशिपमूळे देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती. कंगना राणावतवर तिचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने गंभीर आरोप केले होते. कंगना काळी जादू करायची असा आरोप त्याने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

…शेवटी आदित्य पंचोलीच्या धमक्यांना कंटाळून बोनी कपूरने पोलीस स्टेशनमध्ये केली होती तक्रार

पहिल्या चित्रपटामध्ये असे काय झाले की, सलमान खानने घेतला एवढा मोठा निर्णय

‘परदेस’ चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याऱ्या अभिनेत्री आज ‘अशी’ दिसते

लग्न करण्या अगोदर एक वर्ष लिव्हिन इनमध्ये राहावे लागेल; सुपरस्टारच्या सासूने ठेवली होती अट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.