काय सांगता! मोठ्या मोठ्या लोकांची बोलती बंद करणारी कंगना राणावत आहे बारावी नापास

फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्र्या त्यांच्या ग्लॅमरस लुकमूळे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. त्यांनी त्यांच्या सुंदरतेने अनेकांना घायाळ केले आहे. कार्यक्रम असो किंवा चित्रपट बॉलीवूडच्या अभिनेत्री सगळीकडे इंग्रजी बोलताना दिसतात. त्यांचे इंग्रजी ऐकून अनेकजण इम्प्रेस होतता.

पण खुप कमी लोकांना माहीती असेल की, फटाफट इंग्रजी बोलणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयूष्यात खुप कमी शिकलेल्या आहेत. त्यांचे शिक्षण बघितल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. जाणून घेऊया बॉलीवूडच्या सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्रींबद्दल.

प्रियंका चोप्रा – बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रियंका सुपरस्टार आहे. तिने तिच्या जबरदस्त इंग्रजीने हॉलीवूडमध्ये देखील यश मिळवले आहे. सध्या ती बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये देखील काम करत आहे.

फटाफटा इंग्रजी बोलून हॉलीवूडमध्ये नाव कमवणारी प्रियंका बारावी पास आहे. बारावीनंतर तिने शिक्षण घेतले नाही. अभिनय क्षेत्रातील करिअर करण्यासाठी प्रियंकाला शिक्षण सोडावे लागले होते. त्यामूळे ती इंडस्ट्रीतील सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

२ करिना कपूर – बॉलीवूडची बेबो करिनाने देखील जास्त शिक्षण घेतले नाही. करिना अभ्यासात हुशार होती. पण तिच्या घरातील वातावरण फिल्मी होते. त्यामूळे हळूहळू तिच्या मनात देखील अभिनयाची रुची निर्माण झाली आणि तिने शिक्षण सोडले. करिना फक्त बारावी पास आहे.

बिपाशा बासू – फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून बिपाशाला ओळखले जाते. बिपाशा कॉलेजमध्ये होती त्यावेळी तिला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर येत होत्या. मॉडेलिंगसाठी तिने शिक्षणाकडे दुलर्क्ष केले आणि ती पहील्या वर्षात नापास झाली.

कंगना राणावत – आपल्या बोलण्याने अनेकांचे तोंड बंद करणारी कंगना सध्या इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री आहे. तिला कोणात्याही ओळखीची गरज नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर कंगनाला बॉलीवूडमध्ये हे स्थान मिळाले आहे. ती बॉलीवूडमधली सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.


आज आपल्या स्वभावाने अनेकांची बोलती बंद करणारी कंगना बारावी नापास आहे. अभिनेत्री बनण्यासाठी तिने शिक्षणाकडे दुलर्क्ष द्यायला सुरुवात केली आणि ती बारावीमध्ये नापास झाली. म्हणून तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण तिने हार मानली नाही. आज ती सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे.

करिश्मा कपूर – ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री करिश्मा कपूर आज चित्रपटांपासून दुर आहे. पण तिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना वेड लावले होते. ती टॉपची अभिनेत्री होती. पण शिक्षणात मात्र ती सर्वात मागे राहिली. करिश्मा कपूर फक्त पाचवीपर्यंत शिकली आहे.

महत्वाच्या बातम्या –
डिंपल कपाडियाच्या आईला मान्य नव्हते मुलगी डिंपल आणि राजेश खन्नाचे लग्न
एक वर्षापासून वेगळे राहणारे धर्मेंद्र व हेमामालिनी वेगळे होणार? स्वत: हेमानेच केला खुलासा
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय वायरल; पहा व्हिडिओ
‘या’ अभिनेत्रीने काहीच नसणाऱ्या अक्षयकुमारला रातोरात स्टार बनवले होते; पण पुढे..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.