कंगना राणौतच्या ‘थलायवी’ने आतापर्यंत किती पैसे कमावले आहेत? आकडा ऐकून धक्का बसेल

बॉलिवूडची क्वीन् म्हणून ओळखली जाणारी कंगना राणावत ही तीच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे नेहमी प्रकाश झोतात असतेच मात्र त्यापेक्षा जास्त वादग्रस्त विधाने करुन ती चर्चेचा विषय ठरते. यावेळेस कंगना चर्चेचा विषय ठरत आहे कारण तिचा थलैवी हा चित्रपट नुकताच म्हणजेच १० सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने एवढी काही खास कमाई केली नसल्याचे दिसून आले आहे. चित्रपट तमिळ तेलुगू हिंदी अश्या विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला असला तरी हिंदी वर्ज़नमधून १ करोड आणि तमिळवर्जन मधून २.७५ करोड रुपये कमावले आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तीन दिवसात चित्रपटाने अनुक्रमे १.३५ करोड , १.६० करोड आणि १.८० करोड कमावले आहेत. विजय सेतुपती आणि श्रुती हसन यांच्या ‘लाबम’ चित्रपटामुळे देखील थलैवीच्या कमाईवर प्रभाव पडला असून त्याचा सरळ सरळ फटका थलैवीला बसला आहे.

IMDB च्या रेटिंग नुसार चित्रपटाने १० पैकी केवळ ५.४ गुन प्राप्त केले आहेत. अश्या विविध कारणांमुळे प्रेक्षकांनी थलैवीकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे. थलैवी हा चित्रपट तमिळनाडूच्या माझी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर असून कंगना राणावतने जयललिता यांची भूमिका सादर केली आहे.

जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ ला हृदयविकाराने निधन झाले होते. चित्रपट जरी कमाई करत नसला तरी चित्रपटातील कांगणाच्या अभिनयाची तारीफ सगळीकडे बचाळली असून जयललिता यांच्या भूमिकेसाठी कंगणाने स्वतःचे २०किलो वजन वाढवले होते.

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो ऑनलाईन लीक झाल्याच्या बातम्या देखील पसरल्या होत्या. त्यामुळे थलैवीला लागलेले ग्रहण कधी सुटेल याची उत्सुकता कंगना राणावत आणि चित्रपटाच्या मेकर्सला लागून राहिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या ठाकरे सरकारच्या डर्टी ११ मध्ये मंत्री हसन मुश्रीफही, १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
पती धोका देत असल्याच्या संशयातून पत्नीने मध्यरात्री त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून लावला नटबोल्ट
२४ वर्षांपासून बंद लिफ्टच्या आतमध्ये दडून होते हे रहस्य, लिफ्ट उघडताच जे समोर आले, पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला
‘मुंबई इंडियन्स’ टीमला मोठा धक्का! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.