कंगणाची शरणागती; फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याची दिली कबुली

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईतील आपल्या राहत्या घरावरही पालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता पाहता त्यासंदर्भात हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे रितसर अर्ज करणारअसून कंगनाच्या अर्जावर चार आठवड्यांत निकाल देणं बीएमसीला बंधनकारक असणार आहे. जर निकाल कंगनाच्या विरोधात गेला तर कारवाईला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात देईल असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.

याचबरोबर केलेले बेकायदेशीर बांधकाम नियमित करून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करण्यास तयार असल्याचेही तिच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले आहे. यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कंगनाला ही मुभा देत, पालिकेला कंगनाच्या या अर्जावर दाखल होताच चार आठवड्यांत निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

कंगनाने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास त्या अनुषंगाने कार्यवाही दोन आठवड्यांपर्यंत करू नये, असे हायकोर्टाचे आदेश दिले. कंगनाने तिच्या खार येथील फ्लॅटमध्ये झालेले अनधिकृत बांधकाम मान्य केले. मात्र ते आपण केलं नसून विकासकाने केल्याचा दावा कंगनाने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रोड रोमिओंची आता गय नाही! स्त्रियांकडे एकटक पाहणं म्हणजे विनयभंग; सत्र न्यायालय
भाजपला दणका! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश
‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करावं’; नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.