‘कुत्री भुंकत राहतात, करणारे आपले काम करत असतात’; कंगणा राणावत मोदींच्या पाठीशी

मुंबई | देशात कोरोनाने वर्षभरापासून थैमान घातले आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थीवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून देशातील वातावरण चांगलच तापलं आहे.

देशात वाढत्या रुग्णसंखेमुळे बेड, ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. मात्र आता बॉलिवूड अभिनेत्री पंगा क्वीन कंगणा राणावत मोदींच्या पाठीशी उभी राहिली आहे.

कंगणाने फेसबूकवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात १४ एम्स रुग्णालय उभे राहिले आहेत असं म्हटले आहे. कुत्री भूंकत राहतात. काम करणारे काम करत असतात. असं म्हणत कंगणाने नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतूक केले आहे.

फोटोमध्ये कंगणाने आतापर्यंतच्या पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळात किती AIIMS (एम्स) रुग्णालय सुरू केले याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून अवघ्या ७ वर्षामध्ये १४ एम्स रुग्णालय सुरू केली आहेत. यावरून देशासाठी कुणी किती केलं आहे हे दिसून येत आहे. असं कंगणाने म्हटलं आहे.

कंगणा राणावतने काहि दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. पंतप्रधान देशासाठी पित्यासमान आहेत. त्यांच्यावर शंका घेणं, त्यांचा पराभव करणं, म्हणजे मुर्खपणाच आहे. असं म्हटलं होतं.

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी देशात घडत असलेल्या गोष्टींवर मत मांडत असते. कंगणा नेहमी वेगळेचं वक्तव्य करून वाद ओढावून घेत असते. सोशल मिडियावर कंगणा चर्चेचा विषय बनत असते.

कंगणा राणावतने फॅशन, गॅंगस्टर, शुट आऊट एट वडाळा, कट्टी बट्टी, मिले ना मिले हम, गेम यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. कंगणाला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. येत्या २३ एप्रिलला तिचा थलायवी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिने तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकांना मिळणार मोफत कोरोना लस
बॉलीवूड सरसावले; अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना थेट लंडनहुन आणणार ऑक्सिजन
लोकं मरायला लागलेत, अन् एसीमध्ये बसून नाटकं करता का? पुण्यात मनसे नगरसेवक अधिकाऱ्यांवर भडकला
आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर संपणार; टास्क फोर्सने दिली माहिती

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.