“बॉलिवूडचे ठेकेदार करण जोहर आणि आदित्या चोप्रा लपून बसलेले असताना मी आलीये बॉलिवूडला वाचवायला”

 

कोरोनामुळे अनेक मोठमोठे चित्रपट प्रदर्शित होत नसून त्यांचे प्रदर्शित होण्याच्या तारखा पुढे ढककल्या जात आहे, असे असताना कंगना रणावतचा थलायवी हा चित्रपट ठरलेल्या तारखेवरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

आता या चित्रपटाबाबत या तरन आदर्श यांनी ट्विट केले होते, त्याला कमेंट् करत कंगणाने एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये  कंगनाने, बॉलिवूडला मी वाचवण्यासाठी मी पूढे आले आहे, असे म्हटले आहे.

तरन आदर्श यांनी ट्विट करत म्हटले होते की, येत्या २३ एप्रिलला थलायवी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषेथा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या ट्विटला आता कंगना राणावताने  रिप्लाय दिला आहे.

त्यांनी मला इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. ते मला खूप त्रास देत होते, पण आता बॉलिवूडचे ठेकेदार करण जोहर आणि आदित्या चोप्रा लपून बसले आहे. पण कंगना आता तिच्या टीमसोबत १०० कोटी बजेटच्या चित्रपटासोबत बॉलिवूड वाचवायला येत आहे, असे कंगणाने म्हटले आहे.

तसेच इतिहासात नोंद होईल की बाहेरून आलेली सावत्रपणाची मिळालेली एक व्यक्तीच तारण हार ठरली आहे, असेही कंगनाने ट्विट करता म्हटले आहे. कंगनाच्या या ट्विटमुळे आता ती पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.