अर्णब अटक! कंगना – ठाकरे सरकारमध्ये जुंपली

मुंबई | ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब यांना अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एका ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्री कंगनाने ट्वीट करत अर्णबला पाठिंबा दिला. सोनिया सेनेला एवढा राग का येतो? आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचं कर्ज फेडावं लागेल, असे म्हंटले आहे.

कंगनाने ट्विट करत म्हंटले आहे की, ‘पप्पूला पाठिंबा देणाऱ्यांना इतका राग का येतो? पेंग्विनला इतका राग का येतो? सोनिया सेनेला एवढा राग का येतो? अर्णब सर, यांना पराचा कावळा करू दे.. आपल्यावर उघडपणे हल्ला करू दे… फाशी देण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर हसू असू दे.. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचं कर्ज फेडायचं आहे.’

दरम्यान, कंगनाने एक व्हिडीओ ट्विट करत म्हंटले आहे की, ‘मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात? असे कंगनाने म्हंटले आहे.

याचबरोबर पुढे कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील,” असे म्हणत तिने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
चिनी मोबाईल कंपन्यांना आपला स्वदेशी मायक्रोमॅक्स देणार टक्कर; दोन स्मार्टफोन लॉन्च

‘महाराष्ट्राच्या सातबारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन महाराष्ट्राचीच‘

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.