कंगनाने काँग्रेस आमदाराला सुनावले; ‘मी कंबर हलवत नाही सरळ हाडं तोडते’

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांनी चांगलीच चर्चेत असती. अशातच आता पुन्हा एकदा आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. यावेळी कंगनाने थेट मध्य प्रदेश बैतूलच्या मुलताई विधानसभेचे काँग्रेस आमदार सुखदेव पानसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच पानसे यांनी कंगनाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होते. यावर आता कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत म्हंटले आहे की, “आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते” असल्याचे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

कंगना म्हणतीये, ‘हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कॅटरिना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिनं आयटम नंबर करण्यास नकार दिला. मी अभिनेते खान आणि कुमार यांच्यासोबत सिनेमे करण्यासही नकार दिला होता. याच कारणामुळे पूर्ण बॉलिवूड गँग, महिला आणि पुरुष सगळेच माझ्या विरोधात आहेत. मी एक राजपूत महिला आहे. जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते.’

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सारनीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कंगनाच्या आगामी धाकड सिनेमाचं चित्रिकरण थांबवण्यासाठी पोहोचले होते. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या लाठीचार्जनंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या
करिना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
पोटाचा घेर वाढला तर रोमान्स होत नाही यार; राखी सावंतचा शॉकिंग दावा
सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा; वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.