करीनाने भुमिका नाकारल्यानंतर ‘सीता’च्या भुमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पोस्टर आला समोर

अलौकीक देसाई यांचा सीता हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती. करीनाने कपूर हा चित्रपट करणार होती, पण तिने १२ कोटींची मागणी केली होती.

करीना कपूरच्या १२ कोटींच्या मागणीमुळे या चित्रपटाचे पुर्ण बजेट बिघडत होते, त्यामुळे सीताचे पात्र करीना कपूरच्या हातून निसटले असून सीता चित्रपटामध्ये सीताची भुमिका आता अभिनेत्री कंगणा राणावत साकारणार आहे. कंगणाने या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.

कंगणा सध्या तिच्या थलायवी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. थलायवी हा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे कंगणावर कौतूकांचा वर्षाव होत आहे. अशात कंगणा आता सीता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे तिचे चाहतेही खुश झाले आहे.

कंगणा राणावतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने सीता चित्रपटात मुख्य भुमिका साकारणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच तिने पोस्टमध्ये असेही सांगितले आहे की या पात्राबद्दल ती खुप उत्साही आहे.

द अवतार- सीता, सीता राम यांच्या आशीर्वादाने प्रतिभावान कलाकारांच्या टीमसोबत या चित्रपटात मुख्य भुमिका साकारण्यासाठी खुप उत्सुक आहे. जय सिया राम, असे कंगणाने पोस्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

अलौकीक देसाई यांचा हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून खुप चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती, आता कंगणाला या चित्रपटात सीताची भुमिका निभावण्याची संधी मिळाली आहे. हा चित्रपट एका भव्य सेटवर बनवला जाणार असून अ ह्युमन बिंग स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

पोलिस अधिकाऱ्याने अभिनेत्रीकडे केली बिकीनी फोटोंची मागणी, अभिनेत्रीने शेअर केली धक्कादायक पोस्ट
तेलांच्या किंमती दुकानाच्या बाहेर लिहाव्या लागणार, नफेखोरी रोखण्यासाठी केंद्राचे पाऊल
काॅमेडीकिंग विनायक माळी झळकणार सिनेमात; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा हिरो होणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.