Mahesh Bhatt : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत तिच्या चित्रपटातील कामासोबतच तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या व्यक्तींबद्दल ती सतत काही ना काही वक्तव्य करत असते. यातच आता तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर टीका केली आहे.
कंगनाने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये महेश भट्ट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम असल्याचे सांगितले आहे. या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, महेश भट्ट यांनी त्यांचे खरे नाव वापरावे आणि कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करू नये.
पुढे तिने लिहिले की, महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम असल्याचे मला सांगण्यात आले आहे. त्यांनी दुसरे लग्न करण्यासाठी धर्म बदलला आहे. तसेच त्यांनी त्यांचे खरे नाव लपवू नये, असे तिने यात म्हटले आहे. महेशजी लोकांना हिंसा करण्यासाठी भडकवत आहेत, असेही तिने लिहिले आहे.
कंगना रणौतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याआधी ती ‘धाकड’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नव्हता.
आता लवकरच तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येणार आहे. यात तिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिनेच केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. यासोबतच कंगनाने अनेक बायोपिकमध्ये देखील काम केले आहे.
याआधी २०२० मध्येही कंगणाने महेश भट्ट यांच्यावर मारहाणीचा गंभीर आरोप केला होता. तसेच महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट हिच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या वेळीही तिने टीका केली होती. त्यानंतर आता तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘आम्ही काही चुकीचं काम केलं नाही, ज्यांना जनतेनी कौल दिला, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बिग ब्रेकींग! नितेश राणेंच्या गाडीचा अपघात; ट्रकने पाठीमागून दिली धडक
ठाकरेंची साथ सोडण्यामागचा ट्रिगर पाॅईंट कुठला? नेमकी कुठं पडली ठिणगी? शिंदेंनी सांगीतली आतली बात
Tanaji Sawant : ‘तुम्ही ज्या हाफकिन माणसाकडून..’; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अज्ञानाने गाठला कळस, सगळीकडे होतेय छी थू






