’तुम्ही अर्णबच्या घरात घुसून त्याला मारलं; अजून किती घरे तोडणार, किती गळे दाबणार?’

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.

गोस्वामी यांना अटक होताच अभिनेत्री कंगना राणावतने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने एक व्हिडीओ ट्विट करत म्हंटले आहे की, ‘मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात? असे कंगनाने म्हंटले आहे.

याचबरोबर पुढे कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील,” असे म्हणत तिने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ‘पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनियासेना,’ असे कंगनाने बोलताना म्हंटले आहे.

अन्वय नाईक प्रकरण काय आहे?
अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तसेच तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.

तसेच अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बिग ब्रेकींग: अखेर रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
माश्याचा काटा घशात अडकल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय; १ मिनिटात निघून जाईल काटा
विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या पोरीला शक्ती कपूरने घरातून फरफटत आणले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.