‘पेंग्वीन म्हणल्यावर राग का येतो? पेंग्वीनसारखं दिसता तर पेंग्वीनच म्हणणार’

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे सरकारने ही सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.

याचाच धागा पकडत अभिनेत्री कंगना राणावतने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने एक व्हिडीओ ट्विट करत म्हंटले आहे की, ‘मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात? असे कंगनाने म्हंटले आहे.

याचबरोबर पुढे कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील,” असे म्हणत तिने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ‘पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनियासेना,’ असे कंगनाने बोलताना म्हंटले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
मुंबई व महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत – संजय राऊत
विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या पोरीला शक्ती कपूरने घरातून फरफटत आणले होते
दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.