…तर भारत देश जिहादी बनेल; कंगना पुन्हा बरळली

तीनही कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. या कायद्यांना काही बॉलिवूड सेलिब्रीटींनी समर्थन दर्शवले होते. त्यातलीच एक म्हणजे अभिनेत्री कंगना राणावत. कंगनानेआता कायदे रद्द केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

तीनही कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्या कंगना राणावतने ते मागे घेण्याच्या निर्णयामुळे संताप व्यक्त केला आहे. आज सकाळीच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील लोकांची माफी मागून, मी मनापासून सांगू इच्छितो की आमचे प्रयत्न कमी पडले असावेत की आम्ही त्यांना कायद्यांबद्दल पटवून देऊ शकलो नाही.

तसेच आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेतील या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मी शेतकऱ्यांना त्यांच्या घरी परतण्याचे आवाहन करतो, शेतात परत या कंगना, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मात्र कंगना पंतप्रधानांच्या या निर्णयावर खूश नाही.

ट्विटरवर बंदी घालण्यात आलेल्या कंगना राणावतने तिच्या इन्स्टाग्रामवरुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचे… संसदेत बसलेल्या सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागले, तर हाही जिहादी देश आहे. .. ज्यांना हे हवे आहे त्या सर्वांचे अभिनंदन.

कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी देखील संबोधले होते. तिनं लिहिलं होतं, मोदीजी, झोपलेल्याला उठवता येतं, गैरसमज असलेल्याला समजावता येतं, पण झोपल्यासारखं वागणाऱ्या, मूर्खासारखं वागणाऱ्याला समजावून सांगितलं तर काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहेत, CAA ने एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गमावले नाही, परंतु त्यांच्यामुळे रक्ताच्या नद्या वाहिल्या आहे.

मात्र, या विधानानंतर कंगनावर बरीच टीका झाली. कंगनाच्या या ट्विटनंतर #Arrest_Castiest_Kangna असे वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंड करू लागले आणि कंगना राणावतला अटक करण्याची मागणी होऊ लागली होती. इतकेच नाहीतर या प्रकरणी आयपीसीचे कलम ४४, १०८, १५३, १५३ ए आणि ५०४ अंतर्गत अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘शेतकऱ्यांना चिरडून मारले याला जबाबदार कोण? त्यांना देशद्रोही, म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी’
एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला ठोकला कायमचा रामराम, चाहत्यांना दिला ‘हा’ मोलाचा संदेश
‘अखंडा’चा शानदार ट्रेलर रिलीज; भारतरत्नवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नंदामुरींनी जिंकली चाहत्यांची मने

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.