एक वर्षाहून जास्त काळ ‘गजनी बायडन’ टिकणार नाहीत; कंगनाचा हल्लाबोल

मुंबई | डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत, डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचले आहे. त्यांची निवड होताच जगभरातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही जो यांचे अभिनंदन केले.

मात्र अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने जो बायडन यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने जो बायडन यांचा उल्लेख गजनी असा केला आणि गजनी बायडन हे एक वर्षाहून अधिक काळ टीकणार नाहीत असंही कंगनाने म्हटले आहे.

कंगनाने याबाबत ट्विट केले आहे. सध्या तिचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होतं आहे. तिने ट्विट लिहिले, ‘गजनी बायडन यांच्याबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त नाही. ज्यांचा डाटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यात इंजेक्ट केले गेलेत की, ते एक वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाहीत.’

दरम्यान, पुढे बोलताना कंगना म्हणतीये,’ यामुळे कमला हॅरीस याच शो पुढे नेतील, हे स्पष्ट आहे. जेव्हा एक महिला पुढे जाते, तेव्हा आपल्यासोबत ती अन्य महिलांसाठीही मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चीअर्स,’ असे कंगनाने म्हंटले आहे.

मात्र कंगनाने कमला हॅरीस यांचं कौतुक केले आहे. जेव्हा एक स्त्री तिची कारकीर्द स्वतः घडवते तेव्हा ती इतर महिलांसाठी त्या वाटा तयार करत असते असे म्हणत कंगनाने कमला हॅरीस यांचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे जो बायडन यांच्यावर मात्र टीका केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
अर्णबसाठी आता नारायण राणे मैदानात; म्हणाले, अर्णबच्या जीवाला काही धोका झाला तर…
म्हातारपणात लग्न केले म्हणुन सोशल मिडियावर उडवली खिल्ली; पण कारण तर जाणुन घ्या
बाॅलीवूड चित्रपटांमधील ‘ही’ सुंदर अभिनेत्री आहे सुपरस्टार गोविंदाची मुलगी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.