मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रणावतला कोरोनाची लागण, स्वतः दिली माहिती

मुंबई । देशात कोरोना दिवसेंदिवस भयानक रुप धारण करत आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच अनेकांचे मृत्यू होत आहेत. आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावतला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः ही माहिती दिली आहे.

सामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडले नाही. अनेक राजकीय नेते, कलाकार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता कंगनाने कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

ती म्हणाली, गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल कोरोना चाचणी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. असे तिने म्हटले आहे.

आता मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे, असेही तिने सांगितले आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असते, कोरोना काळात ती अनेकांवर टीका करत असून ती चर्चेत राहते.

बॉलीवूडमध्ये यापूर्वी देखील अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही कलाकार परदेशात गेले आहेत.

दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाने अधिक लक्ष केले आहे. अनेक तरुण रोज कोरोनाच्या जाळ्यात सापडत आहेत. आता अनेक तज्ञांनी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

पवार, ठाकरेंचे विकृत फोटो पोस्ट करणाऱ्या फडणवीस फॅन क्लब व कोमट बॉईज अँड गर्ल्स ग्रुपवर गुन्हा दाखल

विराट कोहलीच्या कपाटातून अनुष्का शर्मा चोरते ह्या गोष्टी, स्वत:च केला खुलासा

धक्कादायक! पतीचा कोरोनाने मृत्यू, पत्नीने दोन मुलांसह घेतले विष; क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.