गंगेत वाहणारे मृतदेह भारताचे नाहीत तर नायजेरियाचे; पंगा क्विन कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत तिच्या बिंनधास्त आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. आताही कंगणा चर्चेत आली आहे. तिने गंगेत वाहत असलेल्या मृतदेहांविषयी भाष्य केले आहे. यानंतर तिला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच बंगाल हिंसाचाराबद्द्ल कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिचे ट्विटरवर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. अशात कंगना सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय दिसत आहे. अलीकडेच कंगनाने ईदच्या शुभेच्छा दिल्याचा एक फोटो शेअर केला ज्यानंतर ती चांगलीच ट्रोल झाली.

आता कंगनाने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने इस्त्राईल-पॅलेस्टाईन आणि गंगेत वाहत असलेल्या मृतदेहांबाबत भाष्य केले आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

कंगनाने तिच्या चाहत्यांना ईद, अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर ती म्हणते की ‘जग या वेळी बर्‍याच संकटांशी लढा देत आहे. मग ते कोरोना असो किंवा दोन देशांमधील संघर्ष. मला असे वाटते की, अशा काळात आपण संयम ठेवला पाहिजे. या सर्व परिस्थितीमधून आपण काय शिकत आहोत.

कंगना पुढे म्हणते, इस्त्राईलचे उदाहरण घ्या, त्या देशात केवळ काही लाख लोक आहेत, परंतु सहा-सात देशांनी जरी त्यांच्यावर सोबत हल्ला केला तरी ते त्यांना पुरून उरतात. ‘ते ज्या धैर्याने दहशतवादाचा सामना करीत आहेत ते संपूर्ण जगासाठी एक उदाहरण बनले आहेत.

त्या देशातील विरोधी युद्धाच्या मध्यभागी उभे राहून घाण पसरवत नाहीत. तो देश साथीच्या रोगाला सामोरे जातो, कोणतीही आपत्ती असो किंवा युद्धाचा तणाव ते लोक याचा हिंमतीने सामना करतात. बाजूला उभे राहून तमाशा पाहत नाहीत.

तसेच कंगना म्हणाली, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका आजीबाईंचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी ती रस्त्यावर ऑक्सिजन मास्क लावून बसली होती. ते आता जागतिक पातळीवर व्हायरल होत आहे. हा फोटो तर या दरम्यानच्या काळातील नाही.

या गोष्टीचे उदाहरण देत कंगना गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांबाबत वादग्रस्त वक्तव्य करते. ती म्हणते सध्या नदी किनाऱ्यावरील फोटो व्हायरल होत आहेत. त्या पाण्यामध्ये जे मृतदेह वाहत आहेत ते भारताचे नाहीत तर नायजेरियाचे आहेत. येथे राहणारे लोक असे का करत आहेत. ते आपल्याच पाठीत सूरा खुपसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
भारतात ३३ कोटी देव आहेत पण एकातही ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता नाही; शार्ली हेब्दोची टीका
उत्तरप्रदेशात कोरोना चाचण्या निगेटीव्ह येण्यामागे आहे सरकारचा हा ‘झोल’; वाचून तुम्हीही हादराल
सदावर्ते नीट बोल, माजुर्डेपणाची भाषा ऐकून घेणार नाही, विनोद पाटलांनी सदावर्तेना सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.