तुम्ही व्हिलन झालात म्हणून मी हिरो झाले न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पुन्हा तडाखा

मुंबई | मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात कंगनाला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केली असून ती नुकसान भरपाईस पात्र असल्याचं हायकोर्टाने पालिकेला झापले आहे.

याच पार्श्वभूमीवर कंगणाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली असून हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले आहे. तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरली असा टोलाही तिने लगावला आहे.

पुढे कंगणा म्हणतीये, जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि विजय मिळवते तेव्हा हा त्याचा एकट्याचा नाही तर लोकशाहीचा विजय असतो. मला हिंमत देणाऱ्या सर्वांचे आभार आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसणाऱ्यांचेही आभार. कारण तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले.’

कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यासोबत कंगनाची वास्तू नवीन नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आहे. महापालिकेने ७ आणि ९ सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करत मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर म्हटलं होते. त्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता.

 

महत्त्वाच्या बातम्या
…हे मी बोललेच नाही, एबीपी माझाने तात्काळ माफी मागावी – पंकजा मुंडे
कंगना राणावतने केलेल्या टिकेवर पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री, म्हणाले…
जवान शहीद झाल्याच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नाही; अख्या गावावर दु:खाचा डोंगर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.