मुंबई | नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असलेली अभिनेत्री कंगना राणावत आता पुन्हा एकदा वादाच्या सापडली आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
याबाबत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिंह यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तिला सात दिवसांचा अल्टीमेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
तसेच सात दिवसात कंगनाने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असे म्हटले आहे. शेतकरी आंदोलनातील एक वृद्ध महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून कंगनाने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती.
वाचा काय आहे प्रकरण…
कंगनाने शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटला रिट्विट केले होते. कंगणाने ट्विट रिट्विट केले होते, त्यातील आजीला शाहीनबाग आंदोलनातील बिल्किसबानो सांगितलं गेले होते. ज्यावर कंगणाने विश्वास ठेवला होता आणि शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. परंतु नंतर तिने ट्विट डिलीट केले.
‘काम नसेल तर माझ्या शेतात मजूरीला ये’…
आता बठिंडा जिल्ह्यातील एका गावातल्या महिंदर कौर या आजीचा व्हिडिओ समोर आला आहे. या आजीने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आजी म्हणाल्या की, त्यांच्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यांना १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे तिच्या(कंगना) काम नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
‘झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध’
#coronavirus : कोरोनापासून बचावासाठी ‘हा’ नियम पाळावाच लागणार; घ्या जाणून
संजय राऊत यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा, म्हणाले…