‘अख्ख्या पृथ्वीवर माझ्यासारखी दुसरी अभिनेत्री कोणच नाही, म्हणून मी एवढी अहंकारी आहे’

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत ही आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असते. नुकताच कंगनाने स्वत: ची तुलना हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत केली आहे. एवढच नाही तर संपूर्ण जगात अन्य कोणतीही अभिनेत्री तिच्यासारखी नसल्याचा दावा कंगनाने केला आहे. कंगना म्हणाली की, तिच्या सारखे ग्लॅमर आणि अ‍ॅक्शन फक्त माझ्याकडेच आहे.

ट्वीटमध्ये तिने लिहिले, ‘एक कलाकार म्हणून मी इतके वैविध्य दाखवले, तितके या ग्रहावरच्या कोणत्याही दुस-या अभिनेत्रीला आत्तापर्यंत दाखवता आले नाही. लेअर्ड भूमिका दाखवण्यासाठी माझ्याकडे मेरिल स्ट्रीप सारखे रॉ टॅलेंट आहे आणि अ‍ॅक्शन व ग्लॅमरसाठी गल गडोटसारखी प्रतिभा आहे.’

तसेच पुढे बोलताना कंगनाने थेट आव्हानही दिले आहे. कंगना म्हणतीये, ‘या ग्रहावर कोणत्याही अन्य अभिनेत्रीत माझ्यापेक्षा अधिक वैविध्यपूर्ण भूमिका व प्रतिभा साकारण्याची प्रतिभा असेल तर मी माझा अहंकार सोडून देईल. तोपर्यंत मात्र मी या अभिमानातच जगण्याचा आनंद घेणार आहे.’

दरम्यान, कंगनाच्या या ट्वीटनंतर ट्रोलर्स कंगनाचे जुने फोटो शोधून ते पोस्ट केले आहेत. एवढेच नाही तर एका चाहत्याने कंगनाची मजा घेत लिहिले, ‘इतकी का बडबडतेस. आम्ही आधीच तुझे फॅन्स आहोत. असे करून नवे फॅन्स मिळणार नाहीत,’ असे म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कंगनाला उपरती! खारमधील राहत्या फ्लॅटबाबत कंगनाकडून याचिका मागे…
रोड रोमिओंची आता गय नाही! स्त्रियांकडे एकटक पाहणं म्हणजे विनयभंग; सत्र न्यायालय
भाजपला दणका! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.