सचिन वाझेंना पाठींबा देत कंगणा म्हणतीय ‘हे तर शिवसेनेचे कारस्थान’

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एनआयएने अटक केली आहे. एनआयएकडून सचिन वाझे यांना शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे.

या अटकेवर खळबळ उडाली असतानाच अभिनेत्री कंगना रणौत हिनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने सचिन वाझे प्रकरणासाठी शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. त्यांच्या विरोधात मोठं कारस्थान शिजत असल्याचा दावा कंगनाने केला आहे.

कंगना ट्वीट करत म्हणतीये, ‘माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच याच पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.’

तसेच पुढे कंगना म्हणतीये, ‘जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं. माझ्याविरोधात आणखी 200 गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे,’ असे तिने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा; नारायण राणेंनी केली थेट गृहमंत्र्यांकडे मागणी

…म्हणून शिवसेनेसोबत युती केली, MIM खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले कारण

…तर ठाकरे सरकार कोसळेल; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.