कंगना पुन्हा गोत्यात! कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा दहशतवादी म्हणून केला उल्लेख

मुंबई : विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गोंधळ, गदारोळ आणि रणकंदनात रविवारी राज्यसभेत कृषी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) आणि शेतकरी (हक्क आणि संरक्षण) दरहमी ही विधेयके आवाजी मतदाराने मंजूर झाली. तसेच ही विधेयकं राज्यसभेत मांडल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला.

याच पार्श्वभूमीवर दिल्ली, हरयाणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेक शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले. या विधेयकांच्या मंजूरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही देखील दिली.

कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला आहे. या आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याने कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंगनाच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.

‘पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल मात्र, जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAA ला विरोध केला होता,’ असे कंगनाने म्हंटले आहे.

दरम्यान, ‘सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचे नागरिकत्व या कायद्याने हिरावले गेले नाही’, असे ट्विट कंगनाने केले आहे. याचबरोबर कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘या’ योजनेतून मिळवा फ्री गॅस सिलेंडर मिळण्यासाठी शेवटचे दहाच दिवस बाकी; ‘असा’ करा अर्ज
…तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व सुप्रिया सुळेंना सहा महीने तुरूंगात बसावे लागणार
बालकलाकाराचे काम करण्याऱ्या ‘या’ हिरोईनचे नाव वेश्या व्यवसायामध्ये समोर आले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.