एफआयआर दाखल होताच कंगनाने पुन्हा सेनेला डिवचले, म्हणाली, ‘पप्पू सेनेला..

मुंबई | काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगनाची बहीण रंगोली हिच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगितली असल्याची माहिती मिळत आहे.

हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवत आहे. कंगना ही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्विट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे सत्र न्यायालयात तक्रार केली होती.

याचाच धागा पकडत कंगनाने एफआयआरवर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यामध्ये ‘पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?’ असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.

तसेच ‘माझ्यावर आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका. मी लवकरच येतेय,’ असे कंगनाने म्हंटले आहे.

वाचा काय आहे प्रकरण…
वांद्रे सत्र न्यायालयात मोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने तक्रार केली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून कंगना राणावत बॉलिवूड आणि एका समाजाविरोधात वक्तव्ये केली होती.

तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार केली होती. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवत आहे. कंगना ही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्विट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे म्हटले आहे.

तसेच कंगनाचे ट्वीट, व्हिडीओ या व्यक्तीने न्य़ायालयात सादर केले होते. याच पार्श्वभुमीवर न्यायालयाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे
मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण
सचिनची मुलगी सारा तेंडूलकर शुभमन गिलची पत्नी? पहा कसं काय घडलं हे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.