वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर व्हिडीओ शेअर करत कंगनाने चाहत्यांना दिली गुड न्यूज; पहा व्हिडीओ

मुंबई: सोमवारी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात २०१९ मधील अभिनेते आणि चित्रपटांना सन्मानित करण्यात आले. बॉलीवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

हा पुरस्कार सोहळा २०२० च्या सुरुवातीला पार पडणार होता. पण कोरोना व्हायरसच्या संकाटामूळे गेल्या वर्षी हा सोहळा पार पडला नाही. त्यामूळे २०२१ मध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. अभिनेत्री कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कंगनाने मणिकर्णिका आणि पंगा यांसारख्या चित्रपटामध्ये दर्जेदार अभिनय करुन प्रेक्षकांची मने जिंकली होती.

‘मणिकर्णिका’ चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २३ मार्च १९८७ रोजी जन्मलेल्या कंगनाला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामूळे तिचे चाहते देखील खुप आनंदी झाले आहेत.

कंगना सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या व्हिडीओमध्ये तिने चित्रपटाशी निगडीत प्रत्येक व्यक्तिचे आभार मानले आहेत. त्यासोबतच तिने तिच्या चाहत्यांचे आणि कुटूंबाचे देखील आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या –

करण जोहर सुधरणार नाही; आणखी एका अभिनेत्याच्या मुलीला देणार चित्रपट पदार्पणाची संधी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: सुशांतसिंग राजपुतचा चित्रपट ‘छिछोरे’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

…म्हणून अलका याग्निक यांनी बॉलिवूडला ठोकला रामराम, समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.