कंगना लुटतेय पावसात घोडेस्वारीचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई। बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. सध्या गेले वर्षभर ती प्रत्येक विषयावर  तीच मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. ती सध्या राजकारणातील विषयांवर टीका करत असल्याचे आपण पाहिले आहेच.

त्यामुळे तिची हि वादग्रस्त मतं मांडणं तिला वादाच्या भोवऱ्यातही अडकवून जातात. अशातच ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण हे तीच वादग्रस्त वक्त्यव्य नसून सोशल मीडियावरील एक भन्नाट व्हिडिओ आहे. कंगनाने मुंबईच्या पावसात केलेल्या नुकताच घोडेस्वारी करतानाचा तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

तिचा हा घोडेस्वारीचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाचा सुपरहिट अंदाज दिसून येत आहे. रविवारचा वेळ प्रत्येकानं आपल्या परिनं व्यतीत केला. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या गोष्टीचा रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी आनंद घेत असतात. कंगनानंही या दिवसाला घोडेस्वारीनं खास बनवलं आहे.

या व्हिडिओत आपण पाहून शकतो की, नारंगी रंगाचं टीशर्ट, काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. अनेकांनाच तिच्या मणिकर्णिका या चित्रपटाची आठवणही झाली. जिथं कंगनानं झाशीच्या राणीच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला होता. या भूमिकेच्या निमित्तानं तिनं तलवारबाजी, घोडेस्वारी शिकली होती.

ही शकवणी कंगना अद्यापही विसरलेली नाही, याचीच प्रचिती तिचा नुकताच व्हिडीओ पोस्ट करताना लक्षात येत आहे. पावसाळ्याच्या परफेक्ट मोसमात घोडेस्वारीचा आनंद घेताना कंगना खूप खुश दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्या आहेत. व्हिडिओला लाखो लाईक्सही मिळाले आहेत. त्यामुळे आता कंगना पुन्हा चर्चेत आली आहे.

महत्वाच्या बातम्या
इंडिअन आयडल १२: अरुणीता कांजीलालनं गायलं राणू मंडलचं गाणं, हिमेश रेशमियाला झाले अश्रू अनावर
वर्ष उलटलं तरी सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम, उषा नाडकर्णी यांचा सवाल?
हृदयद्रावक! ‘जीवनाचा शेवट करतेय, कारण विचारू नका’ व्हिडिओ शेअर करत तरुणीची आत्महत्या
रतन टाटा देखील ‘या’ २८ वर्षाच्या तरुणाकडून घेतात सल्ला, जाणून घ्या कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.