अर्णबच्या सुटकेवर वेड्यासारखी नाचली कंगना; पहा व्हिडीओ

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लीक टिव्हीचे मालक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. आता अर्णब गोस्वामीला जामीन मिळाला आहे. यावर कंगना राणौतनेही ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत अत्यानंद झाल्याचे म्हणटले आहे.

कंगणाने अर्णब गोस्वामीला अटक केल्यापासून अर्णबला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आता तर चक्क ती एका गाण्यावर थिरकली आहे. कंगनाने शेअर केलेल्या व्हिडिओत आवो जी पधारो मारो देश.. हे गाणे वाजत असून कंगना या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.

कंगना राणौतने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत अत्यानंद झाल्याचे म्हटले आहे. अर्णब यांच्या सुटकेचा माझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, असेही कंगनाने म्हटले आहे.

खरंतरं अर्णबला जामीन मिळाल्यापासून ट्विटर नविन ट्रेंड तयार झाला असून अनेकांनी ‘ही इज बॅक’ असे म्हणत अर्णबच्या सुटकेचे समर्थन केले आहे. यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ही मागे राहिले नाहीत. अनुपम खैर यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही इज बॅक, जय हो… असे म्हटलं आहे.

अर्णबच्या अटकेनंतर राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने रस्त्यावर येऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शनं केली होती. आता त्या नेत्याकडूनही आनंद व्यक्त होत आहे.

..आणि तुम्ही मला काहीही करू शकणार नाही, जेलमधून सुटताच अर्णबने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले

तुरुंगातून सुटताच अर्णबचे राडा घालत जोरजोरात किंचाळत आकांडतांडव

बड्या बड्या बाता मारणारी कंगना घाबरली;आता काय केलं पहा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.