कंगना पुन्हा बरळली; भारतीय क्रिकेटर्संना म्हणाली धोबी का कुत्ता

मुंबई | भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे. याबाबत पॉप स्टार रिहानाने आंदोलनावर ट्विट केले. यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स यांनी याप्रकरणी ट्विट केले. यानंतर सोशल मीडियावर ट्विट वॉर रंगले आहे. पॉप स्टार रिहानाच्या ट्विटवर संतापलेल्या कंगना राणावतने तिला मुर्ख म्हटले होते. आता ती क्रिकेटर रोहित शर्मावरही भडकली आहे.

रिहानाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना भारताच्या अंतर्गत प्रश्नामध्ये बाहेरच्या व्यक्तीने हस्तक्षेप करु नये असं मत व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य राहणे आणि रोहित शर्मा यांनी ट्विट केले आहेत.

‘’जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायम मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची नेहमीच महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे की, आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू’’ असे मत ट्विट करत रोहित शर्माने मांडले आहे.

यावर कंगना भडकली आणि तिने सर्वच क्रिकेटर्सना धारेवर धरले. ती म्हणाली ‘’हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपाचे बोलत आहेत. शेतकरी त्याच्यांच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करतील? असा सवाल कंगनाने विचारला आहे.

तसेच ती पुढे म्हणते, ‘’हे दहश’तवादी आहेत, आणि ते गोंधळ घालत आहेत. असं म्हणा. ते दहश’तवादी आहेत हे म्हणायला भिती वाटते का?’’ असे कंगनाने रोहितला म्हटले आहे.

रोहित शर्माने आंदोलनावर ज्याप्रकारचे भाष्य केले अशाच प्रकाचे ट्विट इतर क्रिकेटर्सने केली आहे. त्यामुळे कंगनाचा घणाघात सर्वच खेळाडूंवर असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात
‘अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी गाझीपुरला जातेय’
“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान
मनसेने काढला वचपा! शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केला मनसेत प्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.