योगी आदित्यनाथांचे कौतूक करताना थकत नाहीये कंगणा; त्यामागे आहे ‘हे’ कारण

मुलुखमैदान: सुशांतच्या प्रकरणावरून कंगणा राणौत चांगलीच चर्चेत आली आहे. आणि काही दिवसांपासून कंगणा ट्विटरवर सतत सक्रिय आहे. एकामागून एक ट्विट करत आहे. कंगनाने शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं कंगनाने स्वागत केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेच्या क्षेत्रात एक फिल्म सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे कंगनाने कौतुक केले आहे.

या ट्विटमध्ये कंगनाने म्हणाली की,’सिने उद्योगात खूप मोठा बदल होण्यास मदत होईल. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचं मी कौतुक करते. सिनसृष्टीत अनेक बदल आवश्यक आहेत. आपण अनेक कारणांमुळे विभागले आहोत. त्यामुळे याचा फायदा हॉलिवूडला मिळतो. एका इंडस्ट्रीत अनेक फिल्म सिटीज आहेत.’

शुक्रवारी मेरठ मंडळ विकास समीक्षेच्या दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची घोषणा केली. देशाला सिनेमांच्या शुटिंगकरता एक चांगल्या फिल्म सिटीची आवश्यकता आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवे ही क्षेत्र या उद्देशाने चांगली जागा आहे. असे योगी आदित्यनाथ यांनी म्हणटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.