केवळ एवढ्याश्या गोष्टीसाठी कंगना राणावत आणि संजय दत्तची मैत्री तुटली होती

बॉलीवूडमध्ये अनेक वेळा चित्रपटाच्या सेटवर दोन अभिनेत्रींची भांडण होतात. त्यामूळे ही गोष्ट काही नवीन नाही. जर चित्रपटात दोन अभिनेते असतील तर मग त्यांच्यामध्ये पण अनेक वेळा वाद होतात. पण चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री या दोघांचे भांडण खुप कमी वेळा होत असतात. पण ज्यावेळी असे भांडण होते त्यावेळी अनेकांना याचे नुकसान भरावे लागते.

बॉलीवूडमध्ये सुद्धा असे भांडण झाले होते आणि या भांडणामूळे अनेकांना धक्का बसला होता. कारण तो अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकांचे खुप चांगले मित्र होते. हे कलाकार आहेत बॉलीवूडचे खलनायक संजय दत्त आणि कंगना राणावत.

हा किस्सा आहे २०१० चा या कालावधीमध्ये कंगना राणावत आणि संजय दत्तची खुप चांगली मैत्री झाली होती. त्यामूळे त्या दोघांनी एक नाही दोन नाही तर चार चित्रपट एकत्र केले होते. त्यासोबतच त्यांनी उंगली हा चित्रपट साइन केला होता.

कंगना आणि संजयची मैत्री झाली होती. त्यासोबतच कंगना आणि संजय दत्तच्या कुटुंबामध्ये पण खुप चांगली मैत्री झाली होती. त्यामूळे कंगना ज्या वेळी मुंबईत घर शोधत होती. त्यावेळी मान्यता दत्तने तिची घर शोधण्यात खुप जास्त मदत केली होती.

संजय दत्तला फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्व खुप मानत होते. त्याच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक ओळखी होत्या. कारण तो गेले अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. संजय दत्तची सर्व कामे त्याचा मॅनेजर धरम ओबेरॉय बघत होते.

त्यामूळे कंगनाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख वाढण्यासाठी धरम ओबेरॉयला स्वतः चा मॅनेजर बनवले. कंगनाची सर्व कामे धरम ओबेरॉय बघत होता. याच कालावधीमध्ये कंगनाने संजय दत्तसोबत knock out, नो प्रॉब्लेम, डबल धमाल आणि रासकल्स यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

२०११ मध्ये संजय दत्तने निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले. त्याने त्याच्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. त्याने त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ‘रासकल्स’ चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. डेविड धवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. या चित्रपटात संजय दत्त, अजय देवगन आणि कंगना राणावत मुख्य भुमिकेत होते.

या चित्रपटाची शुटिंग सुरू झाली होती. चित्रपटाची शुटिंग सुरू झाल्यानंतर डेविड धवनला या अजून काही ऍड करण्याची इच्छा झाली. त्यामूळे त्याने संजय दत्तला सांगितले की, चित्रपटात अजून थोडा मसाला ऍड करायचा आहे. त्यामूळे कंगना चित्रपटात बिकिनी सीन द्यायला सांगू. म्हणजे चित्रपटाची जास्त चर्चा होईल.’

संजय दत्तने ही मान्य केली आणि त्याने ही गोष्ट कंगनाला सांगितली. पण कंगनाने या गोष्टीला नकार दिला. कारण ज्यावेळी तिला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी तिला बिकनी सीनबद्दल काहीही सांगण्यात आले नव्हते. म्हणून तिने याला नकार दिला.

पण संजय दत्तच्या सांगण्यावरून तिने याला होकार दिला. पण तिने एक अट ठेवली. ही अट होती की, तिला जर दहा लाख रुपये देण्यात आले. तर मग ती हा सीन करेल. संजय दत्तने तिची ही अट मान्य केली आणि तो सीन शुट झाला.

चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर कंगनाला वाटले की, चित्रपटात बिकनी सीनची गरज नव्हती. माझ्याकडून जबरदस्तीने हा सीन शुट करून घेण्यात आला आहे. त्यामूळे तिला राग आला आणि तिने चित्रपटाच्या डबिंगला न जाण्याचा निर्णय घेतला. ही संजय दत्तला समजताच तो चिडला.

संजय दत्तला खुप राग आला होता म्हणून त्याने कंगनाला या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी बोलवले नाही. ही गोष्ट कंगना आवडली नाही. म्हणून तिने संजय दत्तसोबतची मैत्री तोडली.

त्यांच्यातले भांडण खुप जास्त वाढले. या दोघांनी मीडियासमोर एकमेकांवर अनेक आरोप केले होते. पण शेवटी मान्यता दत्तच्या सांगण्यावरून त्यांनी मीडियामध्ये भांडण थांबवली. २०१४ मध्ये त्यांनी उंगली चित्रपटामध्ये एकत्र काम केले. पण सेटवर ते एकमेकांशी बोलत नव्हते.

महत्वाच्या बातम्या –

नेपोटिझम किंग करण जोहर परत एकदा स्टार किडला करणार लॉन्च; जाणून घ्या कोण आहे ती स्टार किड

वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर व्हिडीओ शेअर करत कंगनाने चाहत्यांना दिली गुड न्यूज; पहा व्हिडीओ

करण जोहरने त्याच्या करोडोंच्या संपत्तीमध्ये शाहरुख खानच्या मुलांना दिला आहे वाटा; कारण…

….म्हणून अमिताभ बच्चनचे पाय पकडून रडत होती करिना कपूर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.