कंगणावर भारी पडल्या ८५ वर्षीय आजी म्हणाल्या, ‘काम नसेल तर माझ्या शेतात मजूरीला ये’

नेहमीच वाद उडी घेणारी कंगणा आता स्वतः ट्रोल झाली आहे. तिने शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटला रिट्विट केले होते. ट्रोल झाल्यावर कंगनाने हे ट्विट डिलीट केले. पण ज्या आजी विषयी कंगणाने हे ट्विट केले त्या आजीने कंगणाला आता चांगलेच खडसावले आहे.

कंगणाने ट्विट रिट्विट केले होते, त्यातील आजीला शाहीनबाग आंदोलनातील बिल्किसबानो सांगितलं गेले होते. ज्यावर कंगणाने विश्वास ठेवला होता आणि शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. परंतु नंतर तिने ट्विट डिलीट केले. आता बठिंडा जिल्ह्यातील एका गावातल्या महिंदर कौर या आजीचा व्हिडिओ समोर आला आहे. या आजीने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आजी म्हणाल्या की, त्यांच्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यांना १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे तिच्या(कंगना) काम नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.

आजीचे वय ८७ वर्ष आहे. आजही त्या शेतात काम करतात. त्या म्हणतात, “त्या बर्‍याच काळापासून शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे आणि भविष्यातही असेच करत राहणार आहे. कंगनाने १०० रुपये घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असे बोलून शेतकर्‍यांचा अपमान केला आहे. ज्याची तिला शिक्षा झालीच पाहिजे.”

राष्ट्रवादीच्या रेखा जरेंच्या हत्येबद्दल धक्कादायक माहिती उघड; हत्येची दिली होती सुपारी

…तर तृप्ती देसाईच्या तोंडाला काळ फासू; शिवसेनेच्या वाघिणीने दिला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.