Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

कोल्हापूरच्या कणेरी मठातील लोकोत्सवात ५४ गायींचा तडफडून मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर

Tushar Dukare by Tushar Dukare
February 24, 2023
in ताज्या बातम्या, धार्मिक, राजकारण
0

Kolhapur Kaneri Math Cow Death: महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या कणेरी मठातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशी गायींना शिळे अन्न दिल्याने 80 हून अधिक गायींची तब्येत बिघडली आहे. वृत्तानुसार, मठात आतापर्यंत 50 ते 54 गायींचा मृत्यू झाला आहे. तर 30 गायींची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कणेरी मठात पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पथक मठात पोहोचले असून पीडित गायींवर उपचार सुरू आहेत.

मठ प्रशासन गायींच्या मृत्यूबाबत योग्य माहिती देत ​​नसून या प्रकरणावर एकप्रकारे दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरातील कणेरी मठात पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी देशभरातून हजारो लोक येथे पोहोचत असून येथे प्राण्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. मठात एक भव्य गोठाही आहे. या गोशाळेतील गायींना शिळे अन्न खाऊ घातल्याने आतापर्यंत मठातील सुमारे 54 गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

मठातील गोशाळेतील मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाला आहे. सोबतच 30 गायींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व आजारी गायींवर गोशाळेत उपचार सुरू करण्यात आले आहेत. कोल्हापूरचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक काल रात्रीच मठात पोहोचले आहे.

पशुवैद्यकीय अधिकारीही मृत गायींची अधिकृत आकडेवारी देण्यास तयार नाहीत. मृत गायींचे शवविच्छेदन केल्याची चर्चा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मठात एका ठिकाणी हजारो भाकरींचा ढीग दिसला आहे. हे शिळे अन्न वाया जाऊ नये, म्हणून ते गायींना दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

काल रात्रीतून अनेक गायींचे मृतदेह दफन केल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापुरातील कणेरी मठात सुरू असलेल्या या पंचमहाभूत लोकोत्सवासाठी लाखो कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते काही दिवसांपूर्वी येथे आले होते.

पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान पर्यावरणाचे महत्त्व आणि प्राण्यांचे महत्त्व समजावून सांगणारे प्रदर्शन लावण्यात आले आहे. याठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रदर्शनाला अपेक्षेपेक्षा कमी नागरिक येत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत आहे.

गुरांना भाकरी व रोट्या दिल्या जात असल्याने गायींना अन्नातून विषबाधा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कणेरी मठात 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देशभरातून हजारो लोक येथे पोहोचत आहेत.

एवढेच नाही तर मठात कव्हरेजसाठी पोहोचलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना हाणामारी झाल्याची घटनाही समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधींना मठाच्या स्वयंसेवकांची चौकशी करायची होती तेव्हा काही लोकांनी त्यांना मारहाण करून मठाबाहेर हाकलले.

याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित स्वयंसेवकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून करण्यात आली आहे. याशिवाय या महोत्सवात गायी, म्हशी, शेळ्या, घोडे, गाढव, कुत्रे, मांजर यांचे प्रदर्शन दाखवण्यात आले आहेत. मठात एक मोठा गोठाही आहे. उत्सवातील उरलेले अन्न गायींना देण्यात आल्याचा आरोप आहे. सडलेल्या अन्नामुळे गायींची प्रकृती बिघडली.

Previous Post

एका बाईने राणेंना पाडलं म्हणताच नितेश राणे संतापले, थेट अजितदादांची दुखरी नसच दाबली; म्हणाले..

Next Post

पक्ष चिन्ह गेल्यानंतर ठाकरेंना आणखी एक धक्का! ‘या’ बड्या नेत्याला निवडणूक लढवण्यास घातली बंदी

Next Post
Uddhav Thackeray

पक्ष चिन्ह गेल्यानंतर ठाकरेंना आणखी एक धक्का! ‘या’ बड्या नेत्याला निवडणूक लढवण्यास घातली बंदी

ताज्या बातम्या

अमोल कोल्हे अमृता खानविलकर सोबत करणार लग्न! उपमुख्यमंत्रीही होणार? स्वत:च पोस्ट करत म्हणाले…

April 2, 2023

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच मृत्यू; अवघ्या २५ सेकंदात होत्याचं नव्हतं..

April 2, 2023

‘तुम्ही एकदा कोल्हापूरला याच मग…’, संभाजीराजेंनी महंतांना ठणकावले; संयोगिताराजेंबाबत म्हणाले, त्यांनी…

April 2, 2023

आता ऊसाच्या रसावरही लागणार १२ टक्के GST; सरकारचा मोठा निर्णय

April 2, 2023

शेजाऱ्यांच्या घरात मध्यरात्री भयानक आक्रोश, खिडकीतून पाहील्यावर दिसले की पोराने ३८ सेकंदांत ४७ वेळा…

April 1, 2023

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तुफान राडा! सुरक्षा जवान आणि भक्तांमध्ये जुंपली, भक्तांना बेदम मारहान

April 1, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group