मुंबई | आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी संघ आणि खेळाडूंची तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच गुरूवारी आयपीएल लिलाव चेन्नई येथे संपन्न झाला आहे. अशात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने आयपीएल स्पर्धेवर मोठे वक्तव्य केले आहे.
न्यूझीलंड संघाच्या समान्यांचे वेळापत्रक ठरलेले आहे. ते २ जून आणि १४ जूनला लॉर्डस व एजबॅस्टनवर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळाणार आहेत. परंतु याच काळात आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे.
अशात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला याबाबत विचारण्यात आले. यावेळी त्याने देशप्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. तो म्हणाला, लीग क्रिकेटपेक्षा मी देशाच्या संघासाठी खेळायला प्राधान्य देण्याच्या भूमिकेत असणार आहे. अशी परिस्थितीती निर्माण झाल्यास आयपीएल सोडून मी स्वत: न्यूझीलंड संघाच्या सेवेत सहभागी होईल.
याशिवाय विलियम्सन म्हणाला, “तशी वेळ आली तर पैशांसाठी आयपीएल क्रिकेट लीगमध्ये खेळण्याऐवजी मी देशासाठी कसोटी खेळणे पसंत करेन”. दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड ही कसोटी मालिका संपल्यानंतर खेळाडू आपल्या आयपीएल संघासाठी खेळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबो! ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत वाचून धक्का बसेल
“त्याच्या उत्साहाचा खून करू नका” अर्जुन तेंडुलकरसाठी बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी मैदानात
“सचिन आणि विराटने देशासाठी काय मिळवलं? ते फक्त रेकॉर्डसाठी खेळतात अन् करोडो कमवतात”