कांचनावाडीची टुटी-फ्रुटी थेट दुबईत; २३ वर्षीय ऋषीकेशची पुर्ण देशात चर्चा

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कांचनवाडी या छोट्या गावातून टूटीफ्रुटी म्हणजे चेरीची निर्यात होते. ही निर्यात दुबई आणि बांगलादेशात होते. आणि हे यश २३ वर्षीय ऋषिकेश मांगुरे याने मिळवले आहे.

दोन महिन्याला एक कंटेनरचे उत्पादन तो परदेशात पाठवतो. त्यासाठी पपई हा कच्चा माल लागतो. ही पपई तो स्थानिकांकडून आणि तामिळनाडूसह अन्य राज्यांतून मागवतो. जिद्दीच्या जोरावर माणूस कोठेही मजल मारू शकतो हे या उदारणावरून सिद्ध होते.

एजंटशिवाय निर्यात परवाना घेऊनही तुम्ही तुमचा माल परदेशात पाठवू शकता हे त्याने दाखवून दिले आहे. त्याचे शिक्षण सिव्हील डिप्लोमापर्यंत झाले आहे. त्याला यानंतर बी. ई करायचे होते. पण त्याने पुढे शिक्षण घेतले नाही.

त्याने शेतीत काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्याची घरचीही शेती होती. यातून त्याने केळीचे वेफर्स बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. एजंटमार्फत माल परदेशात पाठवण्याचा प्रयत्न त्याने केला पण त्याला यश आले नाही.

पुढे त्याने यावर अभ्यास केला आणि काही वर्षांनी त्याला चेरी उत्पादनाचा मार्ग सापडला. केक, आईसक्रिम बनविणाऱ्या कंपन्यात तो त्याचा माल पुरवतो. त्याला प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन या प्रॉग्रॅम या योजनेतून कर्ज व अनुदान मिळाले होते.

त्याने गावातील शेतात स्वाताची फॅक्टरी उभी केली आहे. त्यानंतर त्याने दुग्धजन्यपदार्थ, आईस्क्रीम बनविणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला. स्थानिक बाजारांच्या एवजी त्याने आंतरराष्ट्रीय मार्केटवर लक्ष केंद्रित केले.

त्याने एका बांगलादेशी उद्योजकाला कांचनवाडीत भेट देण्याची विनंती केली आणि तो उद्योजकही कांचनवाडीत पाहणीसाठी आला होता. उत्पादनाचा दर्जा पाहिल्यानंतर त्यांनी ऑर्डर देण्यास सुरूवात केली.

तमिळनाडू, कर्नाटक आणि अन्य राज्यात पपईचे पिक भरपूर आहे. तेथून कच्चा माल कांचनवाडीत येतो. यावर २० ते ३० दिवसांची प्रक्रिया केली जाते. असे करून रोज ५०० ते १००० किलो चेरी तयार केली जाऊ शकते.

ऑर्डरप्रमाणे रंग आणि साखरेचे प्रमाण ठरवले जाते. त्याने या प्रक्रियेच प्रशिक्षण घेतले होते. आता पुर्ण गावात त्याचीच चर्चा होत आहे. कारण परदेशातून त्याच्या टूटी फ्रुटीला मागणी आहे. अनेक लोक त्याच्या या फॅक्टरीला भेट देण्यासाठी येत असतात.

महत्वाच्या बातम्या
आश्चर्यकारक! कबूतरांचा सांभाळ करून सांगलीचा हा पठ्या कमावतोय लाखो रूपये
..आणि सलूनवाल्याने पेरला काळा गहू, काढणीच्या आधीच गव्हाला आलीये मोठी मागणी
महाराष्ट्रदिनी राज्याला मिळणार मोफत लसींचं मोठं गिफ्ट; अजित पवारांनी दिले संकेत
जीव गेला तरी बेहत्तर, पण व्यसन जाणार नाही! व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा तंबाखु मळतानाचा विडिओ बघाच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.