पंजाबमधील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कंगना म्हणाली देशद्रोही

हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले आहे. यात अनेक पंजाबमधील अनेक अभिनेत्यांनी सरकारचा निषेध केला आहे. अश्याच एका अभिनेत्याला कंगणाने ट्विट करून खडे बोल सुनावले आहेत.

जेव्हापासून मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांनी चलो दिल्ली मोर्चा सुरू केला तेव्हापासून पंजाबचा अभिनेता दीप सिद्धू निषेध मोर्चात सहभागी झाला आहे. या अभिनेत्याने गेल्या दोन दिवसांपासून पंजाब ते दिल्ली या प्रवासात अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत.

तसेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दीप सिद्धूने शेतकरी असल्याचा दावा केला आहे. तसेच कृषी कायद्याबाबत दिशाभूल करणारे दावे केले आहेत. दीप सिद्धूने शेतकर्‍यांच्या निषेधाचे नेतृत्व केले आहे.

याला कंगणाने उत्तर दिले आहे. “लाज ….. शेतकर्‍यांच्या नावावर प्रत्येक जण आपली पोळी भाजत आहे. आशा आहे की सरकार देशद्रोही घटकांना याचा फायदा घेण्यास परवानगी देणार नाही. आणि रक्ताचे तहानलेले गिधाड आणि तुकडे टोळीसाठी आणखी एक शाहिन बाग दंगल घडवू देणार नाही. असे ट्विट कंगणाने केले आहे.

लसीचे वितरण कसे होईल? लस कुठे साठवणार? याबद्दल पुनावालांनी दिली महत्वाची माहिती

महिन्याभरात सोने चार हजार रुपयांनी घसरले; अजून सोने किती रुपये घसरणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.