ऍक्टींग सोडून राजकारणात उतरणार पंगा क्वीन; सांगितला आपला फ्युचर प्लॅन

अभिनेत्री कंगणा राणावत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता नुकताच तिचा थलाईवी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये तिने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भुमिका निभावली आहे. या चित्रपटात केलेल्या अभिनयमामुळे तिने लोकांची मने जिंकून घेतली आहे.

आपल्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कंगणाने आता राजकारणात येण्याचे संकेत दिले आहे. कंगणाने मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी पत्रकारांनी तिला काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांचे उत्तर देत तिने राजकारणात येण्याचे संकेत दिले आहे.

भविष्यात जर लोकांनी तिला मला निवडले तर मी राजकारणात नक्की येईल, असे कंगणाने म्हटले आहे. कंगणाने नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर बिंधास्तपणे आपले मत मांडत असते, त्यामुळे ती चर्चेत येत असते. आताही तिने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे ती चर्चेत आली आहे.

नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कंगणालाही अनेक पत्रकार वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. तिला आधीही हा प्रश्न विचारण्यात आला होता, पण तिने आधी नकार दिला होता. पण थलाईवी चित्रपटात काम केल्यानंतर पुन्हा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गुरुवारी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती, तर तिला यावेळी राजकारणात येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी कंगणा म्हणाली, मी एक देशभक्त आहे. त्यामुळे मी नेहमीच देशाशी संबंधित असलेल्या मुद्यांवर बोलत असते.

मी देशाशी संबंधित असलेल्या मुद्यांवरही बोलत असले तरी लोकांना वाटते की मी राजकारणाच्या संबंधित बोलत आहे. मी एक जबाबदार नागरीक आहे आणि त्या लोकांसाठी बोलते ज्यांनी मला सेलिब्रीटींचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मी लोकांच्या आणि देशाच्या अधिकांबाबत बोलत असते, असेही कंगणाने म्हटले आहे.

मी नेता बनू शकते की नाही, हे माझ्या हातात नाही. नागरीकांच्या पाठिंब्याशिवाय ग्राम पंचायतीची निवडणूकही नाही लढू शकत. जर मला राजकारणात यायचे असेल, तर लोकांनी आधी मला पाठिंबा दिला पाहिजे. पण सध्या मी अभिनेत्री म्हणून ठिक आहे, असे कंगणाने म्हटले आहे.

 महत्वाच्या बातम्या-

PI संजय निकम यांची पत्रकारांवर दादागिरी; लालबागच्या राजाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना केली धक्काबुक्की
मुलांच्या ट्रोलींगमुळे करीनाला दुख: अनावर; “किती गोड मुलं आहेत माझी पण लोक त्यांना…
तीनवेळा लग्न अन् तीनवेळा मोडला संसार; माहेरी आलेल्या मुलीने खुर्चीवर बसलेल्या बापासोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.